'अभिनंदन'ची आई सुद्धा आहे रणरागिनी, जगभरातल्या युद्धग्रस्त उभं केलं काम

'अभिनंदन'ची आई सुद्धा आहे रणरागिनी, जगभरातल्या युद्धग्रस्त उभं केलं काम

Doctors Without Borders या संघनेच्या माध्यमातून त्यांनी जगभरातल्या युद्धग्रस्त भागात लोकांवर उपचार करण्याचं काम केलं.

  • Share this:

चेन्नई 1 मार्च  : लढाऊ विमानाच्या पायलटचा अॅटिट्यूड कसा पाहिजे कसा पाहिजे? असा प्रश्न आठ वर्षांपूर्वी हवाई दलाच्या काही पायलट्सना विचारण्यात आला होता. त्यावेळी सगळ्यांनी उत्तर दिलं होतं 'गुड' अॅटिट्यूड फक्त एकाच पायलटचं उत्तर होतं 'बॅड' अॅटिट्यूड. त्या पायलटचं नावं होतं विंग कमांडर अभिनंदन वर्तमान.

पाकिस्तानच्या ताब्यात असतानाचा अभिनंदनचा जो व्हिडीओ व्हायरल झाला होता त्यात अभिनंदन ज्या शांतपणे, आत्मविश्वासाने आणि धीराने पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांना उत्तर देत होता त्या उत्तरांनी सर्व देश थक्क झाला. जवानाला जो निडरपणा, बेडरपणा लागतो तो म्हणजेच बॅड' अॅटिट्यूड असं समर्थन अभिनंदने त्या वेळी केलं होतं. त्याचा प्रत्यय त्याने सर्व देशाला दाखवून दिला.

अभिनंदनमध्ये ही लढण्याची वृत्ती आलीय ती त्याच्या आई कडून अशी माहिती निवृत्त ग्रुप कॅप्टन तरुण के सिंग यांनी दिलीय. सिंग हे वर्तमान कुटुंबीयांना गेली अनेक दशकं ओळखतात. अभिनंदन प्रकरणानंतर त्यांनी  अभिनंदनची आई डॉ. शोभा वर्तमान यांची ओळख करुन दिली.

अभिनंदनचे वडील एस वर्तमान हे हवाई दलात एअर मार्शल होते. तर आई या डॉक्टर. Doctors Without Borders या संघनेच्या माध्यमातून त्यांनी जगभरातल्या युद्धग्रस्त भागात लोकांवर उपचार करण्याचं काम केलं. इराक पासून ते हैती पर्यंत यादवी, युद्ध आणि हिंसाचाराने ग्रस्त असलेल्या भागात त्यांनी लोकांची सेवा केली.

अशा हिंसाचारग्रस्त भागात सेवा देणं, लोकांवर उपचार  करणं हे प्रत्यक्ष रणांगणावर लढण्याएवढेच मोठं होतं. पण त्यांनी अतिशय धैर्याने आणि शौर्याने त्या भागात जाऊन, तिथे राहून लोकांना मदत केली.सिंग सांगतात की, डॉ. शोभा या लहानपणापासूनच अतीशय धाडसी होत्या. त्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांच निधन झालं. त्यामुळे शोभा आणि त्यांच्या भावडांना अतिशय खडतर परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. या परिस्थितीमुळेच त्या कणखर बनल्या.

2005 मध्ये आयव्हरी कॉस्ट इथं प्रचंड हिंसाचार सुरू असताना अतिशय दुर्गम भागात जाऊन त्यांनी सेवा दिली होता. नायजेरीया, लायबेरीया इथल्या यादवीनंतर त्यांनी संयुक्त राष्ट्रातर्फे त्या भागात लोकांवर उपचार केले. आखाती युद्धानंतर इराकमधलं त्यांच काम अतिशय जोखमीचं होतं. अशा युद्धग्रस्त भागात काम करताना अनेकदा त्या हल्ल्यातून बचावल्याही. पण त्यांनी उपचार करणं सोडलं नाही.

यादवीने ग्रस्त असलेल्या हैती या देशात भूकंपात 3 लाख जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या पथकाने केलेलं काम हे अतिशय उल्लेखनीय होतं. लहान मुलांवर लैंग अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी त्या सध्या ऑनलाईन मोहिम चालवत आहेत.

First published: March 1, 2019, 10:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading