मराठी बातम्या /बातम्या /देश /

द्वारकाधीश मंदिरावर कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO, लोकांमध्ये रंगली ‘ही’ चर्चा

द्वारकाधीश मंदिरावर कोसळली वीज, पाहा LIVE VIDEO, लोकांमध्ये रंगली ‘ही’ चर्चा

भारतातील प्रसिद्ध धर्मस्थळ असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळल्यामुळे एकच हाहाकार उडाला आहे.

भारतातील प्रसिद्ध धर्मस्थळ असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळल्यामुळे एकच हाहाकार उडाला आहे.

भारतातील प्रसिद्ध धर्मस्थळ असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरावर वीज कोसळल्यामुळे एकच हाहाकार उडाला आहे.

  • Published by:  desk news

द्वारका, 13 जुलै : भारतातील प्रसिद्ध धर्मस्थळ असणाऱ्या द्वारकाधीश मंदिरावर (Dwarakadish Temple) वीज (lightning) कोसळल्यामुळे एकच हाहाकार उडाला आहे. द्वारकेतील प्राचीन द्वारकाधीश मंदिरावर अचानक वीज कोसळली आणि या मंदिराच्या कळसावर लावलेल्या 160 फुटी ध्वजाचं (flag) मोठं नुकसान झालं. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि जोरदार चर्चांना सुरुवात झाली.

नेमकं काय घडलं?

गेले 15 दिवस विश्रांती घेतल्यानंतर उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मान्सून सक्रिय झाला आहे. काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी संततधार पाऊस सुरू आहे. मात्र या काळात बहुतांश राज्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडत असून त्यामुळे अऩेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागण्याच्या घटना घडल्या आहेत.

मंगळवारी सकाळपासूनच द्वारकेमध्ये ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. विजांचे कानठळ्या बसवणारे आवाज ऐकून घराबाहेर असणाऱ्या अनेकांनी घरात किंवा दुकानांमध्ये आसरा घेतला. त्याचवेळी अख्ख्या शहराला हादरवून सोडणारा विजेचा जोरदार आवाज झाला आणि सर्वांच्याच पोटात गोळा आला. काही वेळात द्वारकाधीश मंदिरवर वीज कोसळल्याचं लक्षात आल्यावर शहरात आणि देशभर जोरदार चर्चा रंगल्या.

हे वाचा - शरद पवारांनंतर आता प्रशांत किशोर राहुल गांधींच्या भेटीला

अशी रंगली चर्चा

परमेश्वरानं नागरिकांवर आलेलं संकट स्वतः झेलल्याची चर्चा द्वारकेत रंगली होती. गेल्या तीन ते चार दिवसांत उत्तर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर द्वारकेतही वीज कोसळली, मात्र द्वारकाधीशाने ही वीज स्वतःच्या कळसावर झेलून नागरिकांना सुरक्षित ठेवलं, अशी चर्चा द्वारकेमध्ये आणि समाजमाध्यमातही रंगली.

First published:

Tags: Temple, Uttar pardesh