काँग्रेस नेत्यापासून जीवाला धोका, 10 आमदारांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्याने खळबळ

आमदारांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 10, 2019 10:21 AM IST

काँग्रेस नेत्यापासून जीवाला धोका, 10 आमदारांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केल्याने खळबळ

मुंबई, 10 जुलै : 'काँग्रेस नेते डे.के शिवकुमार आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यापासून आमच्या जीवाला धोका आहे,' असं पत्र कर्नाटकच्या 10 बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांना लिहीलं आहे. आमदारांच्या या आरोपामुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कर्नाटकमधील 10 बंडखोर आमदार सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांची समजूत काढण्यासाठी कर्नाटकमधील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले डी.के. शिवकुमार हेदेखील आता मुंबईत दाखल झाले आहेत. मात्र ज्या आमदारांना भेटण्यासाठी शिवकुमार आले त्याच आमदारांनी शिवकुमार यांच्यापासून आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार केली आहे.

'शिवकुमार आणि कुमारस्वामींना भेटण्याची इच्छा नाही' असंही बंडखोर आमदारांनी मुंबई पोलिसांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सध्या सगळे 10 आमदारा रेनिसान्स हॉटेलमध्ये असून कडक सुरक्षेत त्यांना ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे आमदारांची समजूत काढण्यासाटी आलेल्या डीके शिवकुमार यांना पोलिसांनी हॉटेलबाहेरच रोखलं आहे.

जर बंडखोर आमदारांची इच्छा असेल तरच शिवकुमार हे हॉटेलमध्ये जाऊ शकणार असल्याची माहिती आहे.

'मला माझ्या रूम मध्ये जाऊ दिलं जात नाही. मला हॉटेलमध्ये विश्रांती घेऊन कॉफी प्यायची आहे. माझ्याकडे कुठलंही शस्त्र नाहीय, तरीही मला पोलीस आत सोडत नाहीत. अशा प्रकारे मला रोखता येणार नाही,' अशी भूमिका शिवकुमार यांनी घेतली आहे. शिवकुमार हे अजूनही रेनिसन्स हॉटेलबाहेर आहेत.

Loading...

कर्नाटकमधील राजकीय नाट्य

कर्नाटक सरकारवरचं संकट अजून कायमच आहे. दोन अपक्ष आमदारांनी काँग्रेस आणि जेडीएस यांच्या आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेत राजीनामे दिले. एच. नागेश आणि आर. शंकर हे राजीनाम्यानंतर राज्यपालांना भेटले आणि त्यांनी आपला पाठिंबा भाजपला असल्याचं त्यांना सांगितलं.

2018मध्ये काँग्रेस – जेडीएसनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर अवघ्या 13 महिन्यात आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे काँग्रेस – जेडीएस सरकार अस्थिर झालं. या आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न देखील झाला. पण, आपल्या राजीनाम्यावर मात्र 14 आमदार ठाम आहेत. पण, विधानसभा अध्यक्षांनी 14 आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारले नाहीत.

SPECIAL REPORT : ग्रामीण भागातली अस्सल मराठी शाळा पडली इंग्लिश शाळेवर भारी!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 10, 2019 10:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...