जीवन बीमा निगमच्या कर्मचारी असोसिएशनचे कलकत्ता विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप मुखर्जी म्हणाले, आम्ही मंगळवारी 12.15 वाजल्यापासून ते 1.15 वाजेपर्यंत 1 तासाचे आंदोलन करणार आहोत. त्यानंतर आम्ही आमच्या सर्व कार्यालयात प्रदर्शनदेखील आयोजित करणार आहोत. ते म्हणाले, त्यानंतर आम्ही रस्त्यावर उतरु आणि अर्थमंत्र्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करू.
LIC चा अंशिक गुंतवणुकीचा प्रस्ताव हा राष्ट्रहिताविरोधी असल्याचे मुखर्जींनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, ही कंपनी सध्या निधीसंदर्भातील भारतातील सर्वात मोठी वित्तीय कंपनी आहे. ज्याने भारतीय स्टेट बॅंकेलादेखील मागे सोडले आहे. मात्र अर्थसंकल्पात सांगितल्याप्रमाणे या कंपनीतील सरकारी भागीदारी विकणे चुकीचे आहे. ऑल इंडिया इन्शोरेन्स एम्पलॉई असोसिएशननेदेखील सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. त्यांच म्हणणं आहे, की फेब्रुवारीच्या 3 वा 4 तारखेला 1 तास आंदोलन करण्यात येईल. एआयआयईएचे महासचिव श्रीकांत मिश्रा यांनी सांगितले, की आम्ही केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात आहोत. पहिल्यांदा आम्ही 3 वा 4 फेब्रुवारी रोजी 1 तासाचे आंदोलन उभारणार आणि त्यानंतर आपल्या पुढील वाटचाल ठरवणार. देशभरातील विविध एलआयसीच्या कार्यालयांमध्ये आंदोलन पुकारले असून पुढे जाऊन हे कर्मचारी रस्त्यांवर उतरून निदर्शने करण्याच्या तयारीत आहेत.