Elec-widget

जम्मू काश्मीर : 'लष्कर-ए-तोयबा'तील टॉपच्या दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा

जम्मू काश्मीर : 'लष्कर-ए-तोयबा'तील टॉपच्या दहशतवाद्याचा जवानांनी केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत उडालेल्या चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा'चा टॉपचा दहशतवादी आसिफला कंठस्नान घालण्यात आलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 11 सप्टेंबर : जम्मू-काश्मीरमधील सोपोर येथे सुरक्षा दलाच्या जवानांसोबत उडालेल्या चकमकीत 'लष्कर-ए-तोयबा'चा टॉपचा दहशतवादी आसिफला कंठस्नान घालण्यात आलं आहे. भारतीय लष्कराला मिळालेलं हे मोठं यश आहे. ही माहिती पोलिसी सूत्रांनी दिली आहे. वृत्तसंस्था ANIनं दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आसिफने सोपोरमधील एका फळ विक्रेत्याच्या कुटुंबीयांवर गोळ्या झाडल्या होत्या. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले होते. जखमींमध्ये आसमा जान नावाच्या एका लहान मुलीचाही समावेश होता. सोपोरमध्येच त्यानं शफी आलम नावाच्या मजुरावरही गोळीबार केला होता.

Loading...

(वाचा : भारतीय लष्काराला मोठं यश! काश्मीरमधून 'लष्कर-ए-तोयबा'च्या 8 दहशतवाद्यांना अटक)

दरम्यान, भारतीय लष्कराला काश्मीरमध्ये मंगळवारी (10 सप्टेंबर) दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईत मोठं यश मिळालं आहे. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांना 'लष्कर-ए-तोयबा'चं टेरर मॉड्युल पकडण्यात यश आलं. गुप्तचर संस्थांनी दिलेल्या माहितीनंतर, जवान आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध अभियान राबवलं. या कारवाईदरम्यान 'लष्कर-ए-तोयबा' संबंधित असलेल्या एकूण 8 दहशतवाद्यांना सोपोरमधून अटक करण्यात आली. सध्या या दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू आहे.

(वाचा : ट्रम्प उतावीळ! म्हणाले, भारत-पाक यांच्यात मध्यस्थी करण्यास तयार पण...)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामुल्लातील सोपोरमध्ये 'लष्कर-ए-तोयबा'साठी काम करणाऱ्या काही लोकांची माहिती गुप्तचर संस्थांच्या हाती लागली होती. ही माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवान आणि पोलिसांनी तातडीनं संयुक्त कारवाई राबवत परिसरात शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत आठ संशयित दहशतवाद्यांना अटक केली.

अटक करण्यात आलेल्या या दहशतवाद्यांचा बारामुल्लातील दुकानदारांना बाजार बंद ठेवण्यासाठी धमकी देणं आणि वादग्रस्त पोस्टर्स लावण्याच्या घटनांमध्ये समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

(वाचा :धक्कादायक! 81 वर्षांच्या म्हाताऱ्याचा वेष घेऊन तरुण परदेशात काढणार होता पळ, पण..)

अटक केलेल्या 8 दहशतवाद्यांची नावं

1. एजाझ मिर

2. ओमर मिर

3. तौसीफ नाझर

4. इम्तियाझ नाझर

5. ओमर अकबर

6. फैजान लतीफ

7. दानिश हबीब

8. शौकत अहमद मिर

LIVE VIDEO: उत्सवात दुर्घटना! मिरवणुकीदरम्यान इमारतीचं छत कोसळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 11, 2019 10:24 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...