मोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...!

मोबाईलमध्येही लिंगभेद, 71 टक्के मोबाईल पुरुष वापरतात तर महिला फक्त...!

भारतीय समाजात संपूर्ण स्त्री-पुरुष समानता गाठण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचाय, हे सर्वज्ञात आहेच.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : भारतीय समाजात संपूर्ण स्त्री-पुरुष समानता गाठण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचाय, हे सर्वज्ञात आहेच. पण हा लिंगभेद मोबाईल फोनच्या वापरातही उतरला आहे, हे तुम्हाला माहीत होतं का ?

पुरुष आणि महिला मोबाईल धारकांच्या टक्केवारीत ३३ टक्क्यांचा फरक आहे. याला कारणंही तेच जुने आणि चुकीचे समज. लग्नाआधी मुलीचं तथाकथित अफेअर असायला नको वगैरे. त्यामुळे महिला मोबाईल वापरण्याचं प्रमाण कमी आहे.

पण या तुलनेत पुरुषांचं मोबाईल वापरण्याचं प्रमाण जास्त आहे. पण त्याची कारणं मात्र भलतीच आहे. मुलीने फोन वापरला तरती वाया जाईल असा काहीसा समज लोकांमध्ये आहे. या अशा विचारांमुळे मुलींना फोन देण्यावर पालक बंदी आणतात.

मंडळी, या सगळ्यात आपण खरंच पुढारलेल्या विचारांचे आहोत का असा प्रश्न उपस्थित होतो. तुम्हाला हे वाचून धक्का बसेल पण 71 टक्के पुरुषांकडे मोबाईल फोन आहेत आणि याच्या तुलनेत फक्त 38 टक्के  महिलांकडे मोबाईल फोनआहे.

या सगळ्याची काय प्रमुख कारण आहेत त्याकडे एकदा लक्ष देऊयात..

- लग्नाआधी महिलांनी 'शुद्ध' रहावं हा प्रतिगामी हेतू

- महिलेसोबत सायबर गुन्हे घडू नयेत ही इच्छा

- मुलांवरचं लक्ष विचलित होऊ नये असा बुरसटलेला समज

First published: November 14, 2018, 6:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading