सुरत, 14 जुलै : आजही देशात समलैंगिक संबंधाना विरोध केला जातो. असाच प्रकार गुजरातच्या सुरतमध्ये घडला. घरच्यांनी समलैंगिक संबंधाना विरोध केल्यानंतर एक अल्पवयीन मुलगी पळून गेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सूरतच्या जहांगीरपुरा क्षेत्रामध्ये 16 वर्षांच्या शालेय विद्यार्थीनी आपल्या 22 वर्षीय गर्लफ्रेंडबरोबर पळून गेली. या दोघांचे समलैंगिक संबंध होते. 10 दिवसांआधी दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र घरच्यांना याबाबत कळल्यानंतर त्यांनी या सगळ्याला विरोध केला.
प्राप्त माहितीनुसार जहांगीरपुरा येथील या दोन्ही मुली कामगार कुटुंबातील आहेत. 16 वर्षीय मुलीचे आठवीपर्यंत शिक्षण झाले आहे. या दोघी 4 महिन्यांपासून एकमेकांसोबत होत्या. दोघीही एकत्र फिरायला जायच्या. मात्र घरच्यांनी विरोध केल्यानंतर 16 वर्षीय मुलीने घरात फास लावून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता.
वाचा-सुशांतच्या मृत्यूनंतर महिनाभराने अंकिता लोखंडेची सोशल मीडियावर पहिली पोस्ट
यानंतर घरच्यांना या दोघींच्या समलिंगी संबंधाविषयी माहिती मिळाली. दोघांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध कायम असल्याचे लक्षात येताच, त्यांनी घरातून पळून जाण्याचा प्लॅन केला. 5 जुलै रोजी सकाळी 16 वर्षीय मुलीनं सामान आणण्याच्या बहान्यानं घराबाहेर गेली, त्यानंतर ती परत आलीच नाही. बराच वेळ मुलगी घरी आली नाही म्हणून कुटुंबाने शोध घेण्यास सुरुवात केली. यानंतर संशयाच्या आधारावर 16 वर्षीय मुलीच्या कुटुंबियानी 22 वर्षीय मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
वाचा-3 अल्पवयीन मुलांनी भररस्त्यात चाकू भोसकून केली एकाची हत्या
सध्या पोलीस या तरुणींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असून, एकमेकांच्या समंतीने या दोघी पळून गेल्या असल्याचा अंदाज पोलीस वर्तवत आहेत.
वाचा-धक्कादायक! तब्बल 5 दिवसांनी सापडला अभिनेत्रीचा मृतदेह, तलावात झाली होती बेपत्ता