मराठी बातम्या /बातम्या /देश /मेडिकल कॉलेजमध्ये बिबट्याचं दर्शन; परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO व्हायरल

मेडिकल कॉलेजमध्ये बिबट्याचं दर्शन; परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO व्हायरल

मेडीकल कॉलेजच्या क्वार्टर्समधील पहिल्या मजल्यावर सर्वप्रथम बिबट्याचं दर्शन झालं. सध्या हा परिसर सुरक्षित आहे. परंतु पुन्हा बिबट्या या कॉलेजच्या कॉम्प्लेक्समध्ये आल्यास त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

मेडीकल कॉलेजच्या क्वार्टर्समधील पहिल्या मजल्यावर सर्वप्रथम बिबट्याचं दर्शन झालं. सध्या हा परिसर सुरक्षित आहे. परंतु पुन्हा बिबट्या या कॉलेजच्या कॉम्प्लेक्समध्ये आल्यास त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

मेडीकल कॉलेजच्या क्वार्टर्समधील पहिल्या मजल्यावर सर्वप्रथम बिबट्याचं दर्शन झालं. सध्या हा परिसर सुरक्षित आहे. परंतु पुन्हा बिबट्या या कॉलेजच्या कॉम्प्लेक्समध्ये आल्यास त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

चेन्नई, 8 जानेवारी : कर्नाटकातील (Karnataka) चामराजनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्समध्ये (Chamarajanagar Institute of Medical Sciences) 6 जानेवारी रोजी बुधवारी बिबट्या (Leopard) घुसला. या बिबट्याला पाहून अनेकांची भितीने गाळण उडाली. या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर (Social Media) व्हायरल झाला असून, त्यात या मेडीकल कॉलेजमधील बिबट्याचा वावर स्पष्ट दिसत आहेत.

कर्नाटकातील चामराजनगर मेडीकल कॉलेजमधील डॉक्टर्स आणि प्राध्यापकांच्या रहिवासी भागात (क्वार्टर्स) बुधवारी बिबट्या घुसला. बिबट्याचे दर्शन होताच या परिसरात भितीचं वातावरण पसरलं आहे. द हिंदूच्या वृत्तानुसार, या मेडीकल कॉलेजच्या क्वार्टर्समधील पहिल्या मजल्यावर सर्वप्रथम बिबट्याचं दर्शन झालं. चामराजनगरचे उपायुक्त एम.आर.रवि यांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्वार्टर्स यादवपुरा डोंगरालगत असल्याने अशा प्रकारची घटना घडली असावी. या भागामध्ये अनेकदा बिबट्यांचं अस्तित्व दिसून आलं आहे. भविष्यकाळात अशा घटना टाळण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. सध्या हा परिसर सुरक्षित आहे. परंतु पुन्हा बिबट्या या कॉलेजच्या कॉम्प्लेक्समध्ये आल्यास त्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.

(वाचा - व्हिडीओ कॉलवर बोलत असताना तरुणीचा गेला तोल, पुलावरून कोसळून जागीच ठार!)

चामराजनगरचे मुख्य वनसंरक्षक मनोज कुमार यांनी सांगितलं की, या भागात डोंगरालगत अनेक खुल्या जागा आहेत. भविष्यकाळात अशा घटना टाळण्यासाठी या जागा बंद कराव्या लागतील. सरकारने टेकड्यांवर बांधकामांना परवानगी दिल्याने अशा घटना घडत असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. घटनास्थळापासून सुमारे 7 किलोमीटरवर चामराजनगर इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

(वाचा - जान्हवी कपूरने मुंबईत खरेदी केलं नवं घर; किंमत ऐकून हैराण व्हाल)

पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी बिबट्या पायऱ्या उतरताना या व्हिडीओमध्ये दिसतो. तसंच काही वेळ तो त्याच भागात घुटमळत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर तो काही क्षणासाठी गायब होतो. नंतरच्या दृश्यात तो कॉरिडॉरमध्ये फिरताना दिसतो आहे. त्यानंतर एका दरवाज्यातून तो आत जाण्याचा प्रयत्न करतो आणि लगेचच बाहेर येतो आणि पायऱ्या उतरुन खाली जाताना व्हिडीओमध्ये दिसतो आहे.

" isDesktop="true" id="512004" >

ही घटना घडल्यानंतर त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. भारतीय वनसेवेतील अधिकारी (Indian Forest Service) प्रवीण कासवान यांनी देखील हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हा प्राणी चित्ता असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं, परंतु लगेचच दुसरं ट्विट करुन हा प्राणी अंगावर ठळक काळे डाग असलेला बिबट्याच आहे, असा खुलासा त्यांनी केला आहे.

First published:

Tags: Viral video.