मुलींच्या हॉस्टेलमध्ये शिरला बिबट्या, नंतर 4 तास रंगला थरार, पाहा VIDEO

मुलींच्या हॉस्टेलमध्ये शिरला बिबट्या, नंतर 4 तास रंगला थरार, पाहा VIDEO

त्यानंतर त्या मालकांनी हॉस्टेमधल्या रुम्समध्ये असलेल्या काही मुलींना सूचना देत दार न उघडण्याची सूचना केली आणि खिडक्यांच्या काचाही लावण्यास सांगितले.

  • Share this:

गुवाहाटी 30 नोव्हेंबर: आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत सोमवारी थरार पाहायला मिळला. हा थरार होता बिबट्याचा (Leopard ). जंगली प्राण्यांचं मानवी वस्तीत येणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. गेल्या काही दिवसांपासून प्राणी आणि माणसांमधला हा संघर्ष जास्तच तीव्र झाला आहे. त्याच संघर्षाचं आणखी एक उदाहरण गुवाहाटीत बघायला मिळालं. इथल्या एका मुलींच्या हॉस्टेलमध्येच चक्क बिबट्या घुसला आणि काही तास त्याने ठाम मांडलं. त्यामुळे हॉस्टेलमधल्या मुलींची एकच धावपळ उडाली. नंतर वनखात्याने या बिबट्याला 4 तासांच्या प्रयत्नानंतर पकडण्यात यश मिळवलं आणि पुन्हा त्याची जंगलात रवानगी केली.

हंगेराबारी इथं असलेल्या माईलस्टोन या मुलींच्या हॉस्टेलमध्ये ही घटना घडली आहे. पहाटे हा बिबट्या कंपाउंड वॉल ओलांडत हॉस्टेलमध्ये घुसला आणि ग्रीलमध्ये असलेल्या सोफ्याच्या खाली जाऊन बसला. हॉस्टेलचे मालक जेव्हा पहाटे उठले तेव्हा त्यांना हा पाहुणा आलेला त्यांना दिसला.

त्यानंतर त्या मालकांनी हॉस्टेमधल्या रुम्समध्ये असलेल्या काही मुलींना सूचना देत दार न उघडण्याची सूचना केली आणि खिडक्यांच्या काचाही लावण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची वन खात्याला त्याची माहिती दिली. काही वेळातच वनखात्याचं पथक घटनास्थळी दाखल झालं.

बिबट्या हा सोफ्याखाली अडचणीत बसला आणि तिथेच अडकल्याने त्याला हुसकावून लावणेही अवघड होते. मात्र वनखात्याच्या तज्ज्ञ मंडळींनी त्याला तिथून 4 तासांच्या थरारक प्रयत्नानंतर पिंजऱ्यात बंद करण्यात यश मिळवलं.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 30, 2020, 7:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या