• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • काळीज हेलावणारी बातमी! वडिलांच्या मांडीवरून बिबट्यानं चिमुकलीला पळवलं, जंगलात सापडले अवशेष

काळीज हेलावणारी बातमी! वडिलांच्या मांडीवरून बिबट्यानं चिमुकलीला पळवलं, जंगलात सापडले अवशेष

घराच्या अंगणात आपल्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेल्या वडिलांवर बिबट्याने (Leopard) हल्ला (Attack) करून मुलीला (6 year old girl) पळवून नेल्याची घटना घडली आहे.

 • Share this:
  लखनऊ, 2 ऑगस्ट : घराच्या अंगणात आपल्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेल्या वडिलांवर बिबट्याने (Leopard) हल्ला (Attack) करून मुलीला (6 year old girl)  पळवून नेल्याची घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी घराच्या अंगणात मुलीसोबत खेळत बसलेल्या वडिलांनी अचानक लाईट गेल्यामुळे (Electricity failure) घाबरलेल्या 6 वर्षांच्या मुलीला मांडीवर घेतले होते. मात्र अंधारात बिबट्याने अचानक तिच्यावर हल्ला केला आणि वडिलांच्या तावडीतून तिला घेऊन तो वेगाने पसार झाला. उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बहराईच (Behraich) भागात ही घटना घडली. मुलीचा शोध ही घटना घडताच मुलीला वाचवण्याचा प्रयत्न वडिलांनी केला. मात्र रात्रीच्या गडद अंधारात त्यांना फारसे काही दिसू शकत नव्हते. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे ग्रामस्थ गोळा झाले आणि त्यांनी मुलीचा शोध सुरू केला. मात्र त्यांनाही मुलीचा काहीच शोध लागला नाही. त्यानंतर वनविभागाला याची कल्पना देण्यात आली. वनविभागानं शोध सुरू करून वेगवेगळ्या टीम नेमल्या आणि मुलीचा शोध सुरू केला. शेतात मिळाला मृतदेह दुसऱ्या दिवशी घरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर मुलीच्या शरीराचे काही अवशेष मिळाले. या घटनेमुळं या मुलीच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला असून पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थ सातत्याने करत आहेत. जंगल पार करून वाघ गावात येत असून वनविभाग काहीच करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. हे वाचा -उघड लाच मागणाऱ्या पालिकेतल्या भ्रष्ट अधिकारी आणि क्लार्क महिलेला रंगेहाथ पकडलं सातत्याने लहान मुलांवर हल्ले बिबट्याकडून लहान मुलांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत चालल्या असून या घटनेपूर्वी एक दिवस अगोदर एका सात वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यात या मुलीचा मृत्यू झाला होता. बिबट्या लहान मुलांना टार्गेट करत असून रात्रीच्या वेळी ग्रामस्थ अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहत असल्याचं चित्र आहे.
  Published by:desk news
  First published: