नवी दिल्ली 17 जुलै: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) लडाख (Ladakh) आणि जम्मू-कश्मीरच्या (Jammu-Kashmir) दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी लेहमध्ये LACजवळच्या सैन्य ठिकाणांना भेटी दिल्या. त्यावेळी जवानांसमोर बोलतांना ते म्हणाले, भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंम्मत कुणी करू नये, आम्ही एक इंचही जमीन कुणाला घेऊ देणार नाही. वाईट नजरेने भारताच्या भूमिकडे बघितल्यास याद राखा असा इशाराही त्यांनी चीनला दिला. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लष्करी ठिकाणांना भेटी देऊन चीनला ठणकावले होते.
राजनाथसिंह म्हणाले, भारताच्या 130 कोटी जनतेला आपल्या सेनेचा गर्व आहे. इथे यायला मिळालं हा मी माझा गौरव समजतो. तुमच्या शौर्य आणि बलिदानाचा देशाचा अभिमान आहे असंही त्यांनी सांगितलं.
लेहमधल्या लुकुंग चौकीला त्यांनी भेट दिली. ते म्हणाले, चीनसोबत लष्करी अधिकाऱ्यांच्या पातळीवर चर्चा सुरु आहे. चर्चेच्या 4 फेऱ्या झाल्या आहेत. काही प्रश्न सुटलेले आहेत. शांततेनेच सर्व प्रश्न सुटतील ही आशा आहे. भारताच्या जमीनीवर कुणीही ताबा मिळवू शकत नाही असंही त्यांनी सांगितलं.
आज सुबह लद्दाख़ पहुँच कर सीमावर्ती इलाक़ों का दौरा किया और लुकुंग चौकी पर जाकर भारतीय सेना के जाँबाज़ जवानों एवं अधिकारियों के दर्शन करते हुए उनसे बातचीत करने का अवसर मिला। pic.twitter.com/LTXKwbfSzX
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 17, 2020
संरक्षणमंत्री पहिले लेहला पोहचले. यावेळी त्यांच्यासोबत संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत आणि लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील उपस्थित आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेतील.
गलवान खौऱ्यात भारत-चीनमध्ये झालेल्या संघर्षानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात राजनाथ सिंह लेहला जाणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: लेह येथे पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये उपस्थित सैन्यालाही संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी सैन्य दलाच्या जवानांना प्रोत्साहन दिले आणि रुग्णालयात जखमी सैनिकांची भेट घेतली.