दिवाळीतला सगळ्यात कहर VIDEO : ओठातल्या पेटत्या सिगरेटने रॉकेट उडवताना कधी पाहिलंय?

दिवाळीतला सगळ्यात कहर VIDEO : ओठातल्या पेटत्या सिगरेटने रॉकेट उडवताना कधी पाहिलंय?

हातात रॉकेट्सचा गठ्ठा घेऊन एका रस्त्यावर उभे असलेले हे गृहस्थ चक्क स्मोकिंग करता करता अगदी सहजपणे एकेक रॉकेट उडवत आहेत. तुम्हीच पाहा कसे...

  • Share this:

मुंबई, 29 ऑक्टोबर : दिवाळीचे फटाके अनेक जण उडवतात. त्यात तुम्ही कधी रॉकेट किंवा बाण उडवले आहेत का? सर्वसाधारणपणे ही रॉकेट बाटलीत ठेवून मग पेटवतात, तेव्हा ती सुळ्ळकन सरळ आकाशात झेपावतात. काही उत्साही वीर हातात रॉकेट घेऊन दुसऱ्या हाताने आगपेटी किंवा फुलबाजी किंवा उदबत्तीने रॉकेट लावतात. पण इथे हे महाशय चक्क ओठातल्या पेटत्या सिगरेटने रॉकेट पेटवत आहेत.

हातात रॉकेट्सचा गठ्ठा घेऊन एका रस्त्यावर उभे असलेले हे गृहस्थ चक्क स्मोकिंग करता करता अगदी सहजपणे एकेक रॉकेट उडवत आहेत. एकेक रॉकेट ते तोंडाजवळ धरतात. सिगरेटने ते जरा पेटलं की सरळ हवेत भिरकवताना दिसतात. हा VIDEO सोशल मीडियावर भलताच VIRAL झाला आहे.

इंटरनेटवर सध्या ही 20 सेकंदांची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर झाला नंतर Twitter यूजर्सनी त्यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अशा पद्धतीने रॉकेट उडवणं धोकादायक आणि बेकायदेशीर आहे, इथपासून या काकांना रजनीकांत म्हणण्यापर्यंत अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.

या अशा स्टंट्सचा लहान मुलांवर वाईट परिणाम होतो, अशी काळजी काहींनी व्यक्त केली आहे तर काहींनी याला लीजंड म्हटलंय. हा व्हिडिओ कुठला आहे. या गृहस्थांंचं नाव काय आणि ही कधीची क्लिप आहे याचा उलगडा होऊ शकलेला नाही. Twitter आणि Whatsapp वरून सगळ्या सोशल मीडियावर हा फिरतोय.

अन्य बातम्या

अंडरवेअरमुळे अमेरिकेला सापडला बगदादी, हेराने पुरवली होती माहिती

सत्तास्थापनेचा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार? अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतरच येणार नवं सरकार

नेहा कक्करच्या गाण्यानंतर चाहत्यांनी सुरू केलं रडायला, VIDEO VIRAL

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 29, 2019, 7:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading