Home /News /national /

'Marijuana ला कायदेशीर परवानगी द्या'; स्त्रीवादी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं खळबळजनक वक्तव्य

'Marijuana ला कायदेशीर परवानगी द्या'; स्त्रीवादी लेखिका तस्लिमा नसरीन यांचं खळबळजनक वक्तव्य

तस्लिमा नसरीन आपल्या बंडखोर विचारांसाठी नेहमी चर्चेत असतात. निर्भिड आणि स्वतंत्र विचारांमुळे अनेकदा त्यांना टीकेचाही सामना करावा लागतो.

  मुंबई, 29 सप्टेंबर : सध्या बॉलिवूडमध्ये ड्रग्ज प्रकरणावरुन मोठी चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची या प्रकरणात चर्चा झाली आहे. सुशांत सिंह राजपूत (SSR) मृत्युप्रकरणानंतर बॉलिवूडमधील (Bollywood) ड्रग कनेक्शन समोर आलं आहे. यादरम्यान प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी केलेल्या सूचनेवर जोरदार चर्चा सुरू आहे. तस्लिमा यांनी आपल्या ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट केलं आहे की, अमेरिका-युरोपमधील अनेक राज्यांमध्ये अशंत: व काही ठिकाणी पूर्णपणे कॅनबीस (Marijuana) म्हणजेच गांजाच्या कायदेशीर परवानगी आहे. याबाबत तस्लिमा नसरीन (Taslima Nasreen) यांनी ट्विट केलं आहे. यामध्ये तस्लिमा नसरीन यांनी म्हटलं आहे की, अमेरिका-युरोपमधील अनेक राज्यांमध्ये अशंत: व काही ठिकाणी पूर्णपणे कॅनबीस म्हणजेच गांजाच्या कायदेशीर मान्यता आहे. गांजाला कायदेशीर मान्यता द्यायला हवी. याचा वापर वेदनाशामक म्हणूनही केला जातो. मी कधीच गांजा घेतला नाही. मला गरज नाही. पण मी इतरांचा विचार करते. सध्या बॉलिवूडमधील दीपिका पदुकोन, सारा अली खान, श्रद्धा कपूर यांसारख्या मोठ्या अभिनेत्रींची ड्रग्ज प्रकरणावरुन चौकशी सुरू आहे. तर रिया चक्रवर्ती ही सध्या तुरुंगात आहे. In the USA, almost all states fully or partly legalized cannabis. In Europe, countries legalized cannabis for medical purpose. It should be legalized, whoever needs it,will use it to reduce stress or pain. I don't smoke. i don't need it. I think of others.

  — taslima nasreen (@taslimanasreen) September 29, 2020 तस्लिमा नसरीन आपल्या बंडखोर विचारांसाठी नेहमी चर्चेत असतात. निर्भिड आणि स्वतंत्र विचारांमुळे अनेकदा त्यांना टीकेचाही सामना करावा लागतो. मात्र तरीही त्या शांत बसत नाहीत. मानवतावाद, मानवाधिकार, स्त्रीवाद, नास्तिकता यांसारख्या मुद्द्यांवरुन त्यांच्यावर अनेक धार्मिक कट्टर पंथींयांकडून टीका केली जाते. तस्लिमा यांच्या 1993 मधील लज्जा या कादंबरीमुळे मोठा गदारोळ झाला होता. त्यांना पश्चिम बंगालमधील कलकत्त्यातून बेदखल करण्यात आलं होतं. त्यानंतर ते दिल्लीला स्थायिक झाल्या.
  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Bollywood

  पुढील बातम्या