आता खुशाल जुगार खेळता येणार?

आता खुशाल जुगार खेळता येणार?

देशात क्रिकेटसह जुगारावर होणारी सट्टेबाजी कायदेशीर करावी आणि कॅशलेस पध्दतीनं अधिकृतरित्या जुगार खेळण्याची परवानगी देण्यात यावी असा अहवाल कायदा आयोगानं केंद्र सरकारला दिलाय.

  • Share this:

नवी दिल्ली,ता.6 जुलै : देशात क्रिकेटसह जुगारावर होणारी सट्टेबाजी कायदेशीर करावी आणि कॅशलेस पध्दतीनं अधिकृतरित्या जुगार खेळण्याची परवानगी देण्यात यावी असा अहवाल कायदा आयोगानं केंद्र सरकारला दिलाय. विशेष म्हणजे जुगाराला अधिकृत मान्यता दिल्यास सरकारच्या महसुलात वाढ होऊन देशात विदेशी गुंतवणुक वाढून रोजगाराची निर्मितीही होईल असंही आयोगानं आपल्या अहवालात म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं २०१६ साली केलेल्या सुचनेवरुन विधी आयोगानं सट्टेबाजी संदर्भात अभ्यास करण्यासाठी एका चौकशी समितीचं गठन केलं होतं.. "कानूनी ढाचा- जुआ और क्रिकेट सहित खेलो में सट्टेबाजी " या नावाने हा रिपोर्ट गुरुवारी कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांना सादर करण्यात आलाय. दरम्यान विधी आयोगाच्या या अहवालावर काँग्रेसने सडकून टिका केलीये. भाजपाला देशाचा जुगार अड्डा करायचाय का असा खोचक सवाल काँग्रेसनं केलाय.

प्रक्रिया अवघड

अर्थात भारतात सट्टेबाजीला कायदेशीर मान्यता मिळवणं सोप्प नाही. सट्टेबाजी कायदेशीर करायची ठरवल्यास संसदेला अनेक कायद्यात बदल करावे लागतील. त्यासाठी संसदेला विशेष कायदा संमत करावा लागेल. हा कायदा लागू झाला तर पुढे राज्यही तो कायदा स्विकारु शकतात. पण सरकारची मानसिकता पाहता असा कायदा करणं शक्य नाही अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा...

शिवसेना, मनसेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनचं पहिलं टेंडर निघालं

 Buradi Case: भाटिया कुटुंबाला अज्ञात शक्तीने ग्रासलं होतं,महिला मांत्रिकाचा दावा 

 नवाज शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, इस्लामाबादमध्ये का आहे तणाव?

शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 6, 2018 07:40 PM IST

ताज्या बातम्या