मराठी बातम्या /बातम्या /देश /

कोरोना काळात मृतदेहांची विटंबना, जाणून घ्या मृतांचे कायदेशीर अधिकार आणि हक्क

कोरोना काळात मृतदेहांची विटंबना, जाणून घ्या मृतांचे कायदेशीर अधिकार आणि हक्क

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या (Dead Person) अंत्यसंस्काराची जबाबदारी न घेता मृतदेह नदीत ढकलून देण्यात आल्याच्या घटनेनं सगळ्यांचा थरकाप उडवला. मृतदेहाची (Dead Body) अवहेलना करणाऱ्या अशा कृत्यांच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या हक्काचा मुद्दा पुढे आला आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या (Dead Person) अंत्यसंस्काराची जबाबदारी न घेता मृतदेह नदीत ढकलून देण्यात आल्याच्या घटनेनं सगळ्यांचा थरकाप उडवला. मृतदेहाची (Dead Body) अवहेलना करणाऱ्या अशा कृत्यांच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या हक्काचा मुद्दा पुढे आला आहे.

कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या (Dead Person) अंत्यसंस्काराची जबाबदारी न घेता मृतदेह नदीत ढकलून देण्यात आल्याच्या घटनेनं सगळ्यांचा थरकाप उडवला. मृतदेहाची (Dead Body) अवहेलना करणाऱ्या अशा कृत्यांच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या हक्काचा मुद्दा पुढे आला आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 08 जून : कोरोना साथीच्या (Coronavirus Pandemic) या भीषण संकटात माणसाची अनेक रुपं बघायला मिळाली. एकीकडे माणुसकीचं उदात्त रुप दिसलं तर दुसरीकडे माणुसकीला काळीमा फासणारी विकृतीही दिसली. कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीच्या (Dead Person) अंत्यसंस्काराची जबाबदारी न घेता मृतदेह नदीत ढकलून देण्यात आल्याच्या घटनेनं सगळ्यांचा थरकाप उडवला. मृतदेहाची अवहेलना करणाऱ्या अशा कृत्यांच्या पार्श्वभूमीवर मृतांच्या हक्काचा मुद्दा पुढे आला आहे. मृतदेहाचेही (Dead Body) काही हक्क आहेत, ज्यात आदरानं अंत्यसंस्कार (Last Rituals) करण्यासह इतरही अनेक गोष्टींचा समावेश आहे.

मृत व्यक्तीचे अधिकार :

मृत व्यक्तीच्या हक्कांविषयी बोलताना सर्वप्रथम हे समजून घेणं आवश्यक आहे की मृत शरीरदेखील एक व्यक्ती आहे की मृत्यूनंतर ती एक फक्त निर्जीव वस्तू आहे. न्यूझीलंडचे न्यायशास्त्रज्ञ आणि संशोधक सर जॉन सेलमंड यांनी याबद्दल एक सिद्धांत मांडला होता जो जागतिक स्तरावर मान्य करण्यात आला आहे. त्याला सेलमंड सिद्धांतदेखील म्हणतात. यात एखाद्या व्यक्तीची व्याख्या करताना असे म्हणतात की, जन्मापासून मृत्यूपर्यंत एक व्यक्ती माणूस मानली जाते. सन्मानाने जगण्याचा आणि मृत्यूनंतरही सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार होण्याचा तिला हक्क आहे. यानुसार, व्यक्तीचे मरणोपरांतही काही कायदेशीर अधिकार आहेत.

सामान्य कलम कायदा कलम 3 (42) नुसार, प्रत्येक व्यक्तीच्या मृत्यूबरोबर त्याच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि हक्क संपुष्टात आले तरी मृत्यू आणि अंत्यसंस्काराचे हक्क कायम असतात. त्यामुळे मृत व्यक्तीचं मृत्यूपत्रही गांभीर्याने घेतले जाते आणि त्याचे पूर्ण पालन केलं जावं अशी तरतूद कायद्याने करण्यात आली आहे. भारतीय दंड संहितेतही (Indian Pinal Code) याची तरतूद आहे. मृताच्या शेवटच्या इच्छेचा आदर केला जाईल आणि त्याची प्रतिमा कोणत्याही प्रकारे खराब होणार नाही, याची काळजी कायद्यात घेण्यात आली आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती किंवा संस्था मृत व्यक्तीची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करत असेल तर कायद्यासह मृत व्यक्तीचे नातेवाईक त्याविरूद्ध मानहानीचा गुन्हा दाखल करू शकतात. जिवंत व्यक्तीदेखील आपली प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करू शकते.

गर्भावस्थेत कधीच घेऊ नका ही गोळी; बाळाच्या मानसिक आरोग्यवर होईल परिणाम

मृतदेहांवरही लैंगिक हिंसाचार :

कोरोना काळात मृतांच्या अंगावरील दागिने गायब झाल्याच्या अनेक घटना घडल्या. कधीकधी जगातील काही भागांतून मृतदेहांसोबत लैंगिक हिंसाचार झाल्याच्याही गोष्टी समोर आल्या आहेत. मृत शरीरावर लैंगिक हिंसाचार करण्याच्या विकृतीला नेक्रोफिलिया म्हणतात. गुन्हेगार किंवा मानसिक आजार असलेल्या लोकांमध्ये ही प्रवृत्ती आढळते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि अमेरिकन सायकायट्रिक असोसिएशननं याला पॅराफिलियाही म्हटलं आहे. कायद्याच्या दृष्टीने अत्यंत भयंकर अपराध आहे.

प्रत्येक देशामध्ये मृतदेहावरील लैंगिक अत्याचार किंवा शारीरिक क्रौर्याबद्दल वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद आहे. उदाहरणार्थ, न्यूझीलंडमध्ये, जो कोणी मृताबरोबर कोणत्याही प्रकारचा हिंसाचार करतो त्याला 2 वर्षांची कठोर शिक्षा आणि दंड भरावा लागतो. अमेरिका, ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकामध्येही अशीच शिक्षा आहे. आपल्या देशात मात्र याबाबतीत ठोस कायदा नाही.

गेल्या काही वर्षांत भारतात मृतदेहांवरील लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे तीन जणांनी मुलीचा मृतदेह खोदून काढून त्यावर सामूहिक बलात्कार केला होता. 2006 मध्ये नोएडामध्ये एक व्यापारी आणि त्याची सहकारी महिला यांनी मुलांची हत्या करून त्यांच्या मृत शरीरावर बलात्कार केल्याचं उघडकीस आलं होतं. तरीही याविरोधात आपल्याकडे कोणताही ठोस कायदा नाही. तथापि, भारतीय दंड संहितेच्या कलम 377 अंतर्गत अनैसर्गिक लैंगिक संबंधाबद्दल शिक्षा दिली जाऊ शकते.

नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र खोटं, अमरावतीत शिवसैनिकांचा एकच जल्लोष

भारतीय दंड संहितेच्या कलम 297 अन्वये, मृत्यूनंतर व्यक्तीचे अंतिम संस्कार त्याच्या श्रद्धा किंवा धर्मानुसार न केल्यास शिक्षेची तरतूद आहे. मृतदेहाची विटंबना केल्यास किंवा अंत्यसंस्कारात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास एक वर्षाची शिक्षा आणि दंड करण्याची तरतूद आहे. कलम 211 अंतर्गत मृत व्यक्तीचे सर्व हक्क नमूद करण्यात आले आहेत. यातला सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मृताला सन्मानानं या जगाकडून शेवटचा निरोप दिला जावा. अवयव दान वगळता मृतदेहाची कोणतीही अवहेलना न करता सन्मानानं अंतिम संस्कार करण्याचा नियम आहे. बेघर आणि बेवारस मृतांनादेखील हा नियम लागू आहे, त्यांच्या शरीराद्वारे किंवा कपड्यांद्वारे त्यांचा धर्म ओळखणे शक्य असेल तर त्यानुसार अंत्यसंस्कार करण्याचा कायदा आहे. अंत्यसंस्कारानंतरही हा नियम कायम आहे. विशेषत: मृतदेहाचे दफन केले गेले असेल तर त्याच्या कबरीचीही कोणतीही छेडछाड होऊ नये, असा नियम आहे. अपवाद फक्त न्यायालय एखाद्या संशयास्पद प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आदेश देत नाही अशावेळी असतो. अंतिम संस्कार करण्यापूर्वी शरीराचे हक्क मृत व्यक्तीच्या नातेवाईकांकडे असतात, परंतु त्यानंतर मृतदेह ही कायद्याची जबाबदारी असते.

First published:

Tags: Corona, Dead body