Home /News /national /

JNUमध्ये पुन्हा झाला राडा, 17 विद्यार्थी जखमी तर अनेक बेपत्ता

JNUमध्ये पुन्हा झाला राडा, 17 विद्यार्थी जखमी तर अनेक बेपत्ता

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा डावे आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) भिडले आहेत.

  नवी दिल्ली, 05 जानेवारी : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) पुन्हा एकदा दोन गटांमध्ये हाणामारी झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (ABVP) मुखवटा घातलेल्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीचे समर्थन करणारे विद्यार्थी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या काही गटाला काही मुखवटा घातलेल्या लोकांनी रॉडने मारहाण केली. JNUच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी सांगितले. घोष यांनी एएनआयला दिलेल्या माहितीत, 'मुखवटा घातलेल्या गुंडांनी माझ्यावर पाशवी हल्ला केला आहे. मला रक्तस्त्राव होत आहे मला निर्घृणपणे मारहाण केली गेली. दरम्यान, हल्लेखोर अद्याप ओळखू शकले नाहीत. या विकासाबद्दल दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की वसतिगृहातील काही विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. पोलिसांकडे तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले.

  Sabarmati Hostel: right now. They are beating the students who are inside. Knocking on doors with rods. People are jumping from balconies. #SOSJNU #EmergencyinJNU pic.twitter.com/kWEsQaZ5gE

  — JNUSU (@JNUSUofficial) January 5, 2020 दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही घटनेवर भाष्य केले. केजरीवाल यांनी, “जेएनयूमधील हिंसाचाराबद्दल मला खूप आश्चर्य वाटले. विद्यार्थ्यांवर निर्दयपणे हल्ला करण्यात आला. पोलिसांनी हिंसाचार त्वरित थांबवावा व शांतता प्रस्थापित करावी. आमचे विद्यार्थी जर विद्यापीठाच्या परिसरात सुरक्षित नसतील तर देश पुढे कसा जाईल?”, असे विधान केले आहे. दरम्यान, दिल्ली सरकारच्या वतीनं जवाहरलाल नेहरू विद्यापीठ परिसरात सात रुग्णवाहिका पाठविण्यात आल्या असून स्टँडबाईवर 10 रुग्णवाहिका आहेत. विद्यार्थी परिषदेने डाव्या संघटनांवर केला आरोप तर या सगळ्या प्रकरणात विद्यार्थी परिषदने जेएनयूमध्ये झालेल्या हल्ल्यात डाव्या संघाटना एसएफआय, आइसा, डीएसएफचे विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या हल्ल्यात आतापर्यंत जवळजवळ 15 विद्यार्थी जखमी झाले आहे. तर, 11 विद्यार्थी अजूनही बेपत्ता आहेत. जेएनयूच्या वसतीगृहाचे दरवाजे आणि खिडक्या फोडण्यात आल्या आहेत. याआधीही घडला होता असा प्रकार अलीकडेच जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) माहिती प्रणाली केंद्रावर विद्यार्थ्यांच्या गटाने हल्ला केला होता. त्यावेळी नोंदणी प्रक्रियेवरही परिणाम झाला. त्या संदर्भात जेएनयू प्रशासनाने सांगितले की शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास चेहरा झाकून विद्यार्थ्यांच्या एक गटाने वीजपुरवठा बंद केला. सर्व तांत्रिक कर्मचार्‍यांना भाग पाडून व सर्व्हर बंद केले होते.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  पुढील बातम्या