नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून केली हत्या; रिक्षातून जाणाऱ्या तरुणाने लपून केला VIDEO

नेत्याची भररस्त्यात गोळी झाडून केली हत्या; रिक्षातून जाणाऱ्या तरुणाने लपून केला VIDEO

हा नेता घरी जात असताना सहा जणांनी त्यांची गाडी अडवली व त्यांच्यावर हल्ला केला

  • Share this:

होशंगाबाद, 27 जून : मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख (रविंद्र विश्वकर्मा) यांच्या हत्येचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सुमारे 6 हल्लेखोर दिसत आहेत. मधे राहून गुन्हेगार गोळीबारही करीत आहेत, गोळीबाराचा आवाज व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.

गेल्या शुक्रवारी वीएचपी नेता रवी विश्वकर्मा यांना हल्लेखोरांनी पिपरियाच्या अंडर ब्रिजजवळ रोखले होते. त्यानंतर त्यांच्या कारवर लाठीने हल्ला करण्यात आला. यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. आता या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सांगितले जात आहे की तेथून जाणाऱ्या रिक्षात बसलेल्या एका तरुणाने आपल्या मोबाइलमधून हा व्हिडीओ काढला.

हे वाचा-महाराष्ट्रात कोरोनाचा कहर! नांदेडनंतर ठाणे जिल्ह्यातील आमदार कोरोना पॉझटिव्ह

मिळालेल्या माहितीनुसार, रवि विश्वकर्मा शुक्रवारी संध्याकाळी होशंगाबादहून पिपारिया येथील आपल्या घरी परत जात होते. अंडरब्रिज ओलांडत असताना आधीच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारला घेरले आणि त्याच्यावर हल्ला केला. हल्लेखोर जवळपास 15 मिनिटे रॉडने मारत होते. यानंतर एका बदमाशाने रवी यांना गोळ्या घातल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

विएचपी नेत्याच्या हत्येचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. व्हिडीओमध्ये दिसणार्‍या आरोपींची ओळख पटली असून  त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्हायरल व्हिडीओत सुमारे 6 जण  हल्लेखोर कारला तोडफोड आणि गोळीबार करताना दिसत आहे. रवि विश्वकर्माचे मित्र आणि कारमधील लोकांच्या चौकशीच्या आधारे पोलिसांनी पिपरिया पोलीस ठाण्यात नऊ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

First published: June 27, 2020, 8:47 PM IST

ताज्या बातम्या