ऋषिकेशचा लक्ष्मणझुला पर्यटकांसाठी का झाला बंद?

उत्तराखंडमधल्या गंगेच्या प्रवाहावर असलेल्या ऋषिकेशमधला लक्ष्मणझुला हा सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र आहे पण आता मात्र हा लक्ष्मणझुला कायमचा बंद करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2019 05:30 PM IST

ऋषिकेशचा लक्ष्मणझुला पर्यटकांसाठी का झाला बंद?

ऋषिकेश (उत्तराखंड), 12 जुलै : उत्तराखंडमधल्या गंगेच्या प्रवाहावर असलेल्या ऋषिकेशमधला लक्ष्मणझुला हा सगळ्यांच्याच आकर्षणाचं केंद्र असतं. गंगा नदीच्या वर बांधलेल्या झुल्यावरून चालत जाण्याचा थरार अनुभवण्यासाठी देशभरातून इथे पर्यटक जातात. पण आता मात्र हा लक्ष्मणझुला कायमचा बंद करण्यात आला आहे.

ब्रिटिशांनी 90 वर्षांपूर्वी हा लक्ष्मणझुला बांधला होता. पण इतक्या वर्षांनंतर आता हा पूल जीर्ण झाल्याचा अहवाल तज्ज्ञांच्या समितीने दिला. हा पूल आता पूर्णपणे असुरक्षित आणि दुरुस्ती करण्याच्या पलीकडचा आहे, असं या तज्ज्ञांनी म्हटलं होतं. हा पूल आता कोणताही भार सोसू शकणार नाही, असंही या अहवालात म्हटलं आहे.

सिडकोची नवी मुंबईत 86 हजार 700 घरांची बंपर लॉटरी, असा भरा फॉर्म

भारतातल्या पर्यटकांसोबतच इथे परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने येतात. उत्तराखंडच्या सफरीमध्ये लक्ष्मणझुल्याने चालत जाऊन गंगेचा प्रवाह अनुभवण्याचा आनंद काही औरच होता. ज्यांनी या लक्ष्मणझुल्यावर जाऊन हा आनंद घेतला नाही ते मात्र आता या आनंदाला मुकणार आहेत.

का दिलं लक्ष्मणाचं नाव?

Loading...

गेल्या काही वर्षांत या लक्ष्मणझुल्यावर पर्यटकांची प्रचंड झुंबड उडाली होती. याचा भार येऊन या पुलाचे खांब एका बाजूला कलले होते. त्यामुळे लगेचच हा झुला बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

हा लक्ष्मणझुला 1929 मध्ये बांधण्यात आला होता. गंगा नदीवरचं टिहरी जिल्ह्यातलं तपोवन गाव आणि पौरी जिल्ह्यातलं जोंक या दोन टोकांना जोडणारा हा पूल होता.

हा पूल पादचाऱ्यांसोबतच दुचाकीस्वारही वापरत होते. याला पहिल्यापासून लक्ष्मणझुला असंच नाव आहे. लक्ष्मणाने ज्यूटच्या धाग्यांनी नदी पार केली होती, अशी अख्यायिका आहे. त्यावरूनच या पुलाला लक्ष्मणझुला असं नाव देण्यात आलं.

CID चं शूटिंग

या पुलावर मालिका आणि चित्रपटांचं शूटिंग होत असे. गंगा की सौगंध, संन्यासी या मालिकांसोबतच CID चं शूटिंगही या लक्ष्मणझुल्यावर करण्यात आलं होतं.

284 फूट लांबीचा हा पूल थोडासा झुलत असे. त्यामुळे याला 'झुला' असं म्हणायचे. या लक्ष्मणझुल्यावरून पूर्वी चारधाम यात्रेकरू जात असत. या पुलासोबतच 1990 मध्ये इथे 'रामझुला' ही बांधण्यात आला होता.

============================================================================================

VIDEO : मराठा आरक्षणामुळे OBC आरक्षणाला धक्का बसणार, गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 05:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...