कोण आहे महरीन काजी श्रीनगरमध्ये राहणाऱ्या डॉक्टर महरीन व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी मेडिसीनमध्ये एमडी केलं आहे. डॉ. महरीन काजी दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठाशिवाय यूके आणि जर्मनीतून उच्च शिक्षण घेतलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार महरीन श्रीनगरच्या लाल बाजार येथील राहणारी आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करीत होते.View this post on Instagram
पहिलं लग्न... काश्मिरच्या अनंतनाग येथे राहणारे अतहर आमिर खान यांचं पहिलं लग्न आयएएस टीना डाबी यांच्यासोबत 2018 मध्ये झालं होतं. मात्र हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला होता. यानंतर एप्रिल 2022 मध्ये टीना डाबी यांनी लातूरचे प्रदीप गावंडेंसोबत दुसरं लग्न केलं होतं. त्यांच्या लग्नाचीही मोठी चर्चा सुरू होती.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.