Home /News /national /

येत्या 4 दिवसांत वायव्य भारतात तीव्र थंडीची लाट; महाराष्ट्रातील तापमानातही होणार मोठी घट

येत्या 4 दिवसांत वायव्य भारतात तीव्र थंडीची लाट; महाराष्ट्रातील तापमानातही होणार मोठी घट

Weather In Maharashtra: पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबसह वायव्य भारतात थंडीची लाट (Cold wave in india) आली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत वायव्य भारतात थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर: गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशात सर्वत्र कोरड्या हवामानाची (Weather in Maharashtra) नोंद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन आठवडे संपल्यानंतरही देशात अपेक्षित थंडी पडली नाही. पण आता पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबसह वायव्य भारतात थंडीची लाट (Cold wave in India) आली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत वायव्य भारतात थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना हवामान खात्याने इशारा जारी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातून थंडी गायब झाल्यानंतर, पंजाबसह मध्य महाराष्ट्र आणि बहुतांशी गुजरातमध्ये पुन्हा एकदा थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसात ठिकाणी किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअस तापमानाची घट होणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावर देखील जाणवणार आहे. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातील तापमानात (Temperature in Maharashtra) देखील जवळपास 2 ते 3 अंश सेल्सिअस तापमानाची घट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, विदर्भात देखील थंडीची चाहूल लागली असून याठिकाणी तापमानाचा पारा 12 अंशावर पोहोचला आहे. त्यामुळे विदर्भकरांना गुलाबी  थंडीची अनुभुती येत आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी खाली जाण्याची शक्यता आहे. गेली दोन आठवडे कोरड्या हवामानाची नोंद झाल्यानंतर, विदर्भात थंडीला सुरुवात झाली आहे. हेही वाचा-जानेवारी महिन्यात महाराष्ट्रभर पसरणार Omicron?, तज्ज्ञांनी CM ना केलं Alert खरंतर, सध्या पश्चिमेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर आणि अफगाणिस्तानच्या आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम पुढील दोन दिवसात जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, आणि हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हिमवर्षावासह पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या उत्तर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रासह मध्य भारतात तापमानाचा पारा घसरला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Weather forecast

    पुढील बातम्या