नवी दिल्ली, 15 डिसेंबर: गेल्या दोन आठवड्यापासून महाराष्ट्रासह देशात सर्वत्र कोरड्या हवामानाची नोंद करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन आठवडे संपल्यानंतरही देशात अपेक्षित थंडी पडली नाही. दिल्लीत तापमानाचा पारा 8 अंशावर गेल्यानंतर पुन्हा एकदा राजधानीत किमान तापमान वाढलं आहे. तर पंजाब मात्र कडाक्याच्या थंडीनं गारठलं आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये थंडीची लाट आली आहे. पुढील पाच दिवस पंजाबमध्ये थंडी कायम राहण्याची शक्यता आहे.
याशिवाय येत्या तीन दिवसात हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पंजाबसह आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात येत्या काही दिवसात सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं पडण्याची शक्यता आहे. यामुळे पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वाहन चालकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा-'Omicron इतर वेरिएंटच्या तुलनेत वेगाने पसरतो आहे', WHO कडून खबरदारीचा इशारा
सध्या पश्चिमेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर आणि आसपासच्या परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम पुढील तीन दिवसात जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, आणि हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हिमवर्षावासह पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या उत्तर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
•Cold Wave in isolated pockets very likely over Punjab till 20 and over Haryana, Chandigarh and north Rajasthan from 18 to 20 December, 2021. •Dense fog in isolated pockets very likely over Punjab, Assam & Meghalaya and Mizoram & Tripura in the morning hours of 16 & 17 Dec pic.twitter.com/zYPLkLM4pg
— India Meteorological Department (@Indiametdept) December 15, 2021
दुसरीकडे, तामिळनाडू, पॉंडेचेरी, कराईकल, अंदमान आणि निकोबार बेटे आणि केरळ परिसरात पुढील पाच दिवसात हलक्या सरी कोसळणार आहे. उर्वरित देशात मात्र पुढील पाचही दिवस कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील पुढील पाच दिवस कोरडं हवामान राहणार आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत मात्र किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानाची घट झाली आहे. गेली बरीच दिवस तापमानाचा पारा चढाच राहिल्यानंतर, मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Weather forecast, महाराष्ट्र