कठुआ बलात्कार प्रकरण : पुढील सुनावणी 28 एप्रिलला

कठुआ बलात्कार प्रकरण : पुढील सुनावणी 28 एप्रिलला

पुढील तपासासाठी सर्व आरोपी नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं आरोपींच्या वकीलाकडून सांगण्यात आलं आहे.

  • Share this:

16 एप्रिल : कठुआ सामुहीक बलात्कार प्रकरणी आज सर्व आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं. या प्रकरणाची पुढील सुनवाणी 28 एप्रिलला होणार आहे. दरम्यान या आरोपींमधील अल्पवयीन आरोपीला ज्युवेनाईल कोर्टात हजर करण्यात आलं आणि इतर 7  आरोपींना सेशन्स कोर्टात हजर करण्यात केलं होतं. पुढील तपासासाठी सर्व आरोपी नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं आरोपींच्या वकीलाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पीडित मुलीचे कुटुंबही सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. या प्रकरणाची सुनावणी कठुआच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाऐवजी चंदीगडमध्ये व्हावी अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात आली आहे.

8 वर्षांच्या एका मुलीला आठवडाभर ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला ठार मारण्यात आलं. या प्रकरणातील आठ नराधमांविरुद्ध आज कोर्टात खटला सुरू झाला. नराधमांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आज सकाळी 10 वाजता आरोपींना न्यायालयात सादर करण्यात आलं.

आरोपी सांझी राम, दीपक खजुरिया, सुरेंद्र वर्मा, विशाल जंगोत्रा, तिलक राज, आनंद दत्ता आणि परवेश कुमार यांना मुख्य आणि सत्र न्यायाधीशांसमोर सादर केले.

आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्सटेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरूद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारवर अनेक कलम लावण्यात आली आहेत.

काय आहे कठुआ बलात्कार प्रकरण ?

कठुआ येथील बकरवाल समाजातील एका 8 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जम्मू काश्मीरमध्ये घडला आहे. गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात चक्क पोलिसांचाही समावेश आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये बकरवाल समाज प्रामुख्याने गुराखीचे काम करतात. कठुआचे मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांना सोपवण्यात आलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, 'या सामूहिक बलात्काराचा मास्टरमाईंड सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असत'.

पॉस्को कायदा आणखी कठोर होण्याची शक्यता

दरम्यान, आज केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक आहे. कठुआ आणि उन्नाव घटनांच्या पार्श्वभूमीवर पॉस्को कायदा आणखी कडक करण्याची शक्यता आहे. आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत पोस्को कायद्यात सुधारणा करण्यात येईल, अशी घोषणा होण्याची शक्यता आहे..

12 वर्षांखालील मुलं किंवा मुलींवर बलात्कार झाला तर दोषींना थेट फाशीच्या शिक्षेची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. या संबंधातील घोषणा महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केली होती.

संबंधित बातम्या

आमच्या मुलींना न्याय मिळणारच, कठुआ गँगरेप प्रकरणी मोदींनी सोडले मौन

१२ वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीच मिळावी यासाठी करणार प्रयत्न- मनेका गांधी

बलात्कार प्रकरणी कठोर कायदा, होणार फाशीची शिक्षा - मेहबुबा मुफ्ती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 16, 2018 08:53 AM IST

ताज्या बातम्या