ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं तितली चक्रीवादळ, वाऱ्यामुळे घरं आणि झाडं कोसळली

ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला आज तितली चक्रीवादळ धडकलं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 11, 2018 09:10 AM IST

ओडिशाच्या किनारपट्टीला धडकलं तितली चक्रीवादळ, वाऱ्यामुळे घरं आणि झाडं कोसळली

ओडिशा, 11 ऑक्टोबर : ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला आज तितली चक्रीवादळ धडकलं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं आहे. तसंच ओडिशातल्या चार जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

या वादळामुळे ओडिशा तसंच आंध्र प्रदेशच्या किनारी भागात ताशी 140 ते 150 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. गुरुवारी पहाटे 5:30 वाजता हे तितली चक्रीवादळ ओडिशाच्या सखल भागात धडकले. सध्या या भागात जोरदार पाऊस सुरू आहे.  किनारपट्टीलगतच्या भागात राहणाऱ्या दहा हजार लोकांना सुरक्षितपणे दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

तर राष्ट्रीय आपत्ती प्रबंधन प्राधिकरण (NDMA)ने तितली चक्रीवादळाचा अंदाज घेत नागरिकांना सुरक्षित राहण्यासाठी काही सूचना जारी केल्या आहे.

एकीकडे, हवेच्या वेगवान गतीमुळे कच्चे घरं, झाडे आणि विजेच्या खांबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यामुले पॉवर पोल क्रश झाला आहे. दुसरीकडे, काही भागातील गावांशी संपर्क तुटला आहे. दक्षिण-पश्चिम रेल्वेने तितली वादळामुळे अनेक रेल्वे रद्द केल्या आहेत.

गंजाम, खुर्दा, पुरी, जगतिसिंहपुर आणि केंद्रपाडा ही किनारपट्ट लगतीची गाव आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.

VIDEO: लायसन्स मागितलं म्हणून रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2018 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...