S M L

बीएसएफने उद्धस्त केले पाकिस्तानी बंकर, गोळीबार थांबवण्यासाठी पाकने टेकले गुडघे

बीएसएफच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी फोन करून बीएसएफला गोळीबार रोखण्याची विनंती केली.

Renuka Dhaybar | Updated On: May 20, 2018 11:28 PM IST

बीएसएफने उद्धस्त केले पाकिस्तानी बंकर, गोळीबार थांबवण्यासाठी पाकने टेकले गुडघे

20 मे : सीमारेषेवरच्या पाकिस्तानच्या कागाळ्या काही थांबायला तयार नाहीत. पश्चिमी आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जातंय. बीएसएफने गेल्या 3 दिवसांपासून पाकला जशाच तसं उत्तर दिल्यानं गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानी चौक्यांचं मोठं नुकसान झालं आहे.

शनिवारी चिकन नेक परिसरात पाकचा एक खंदक उध्वस्त करण्यात आला आहे. संरक्षण विभागानं या कारवाईचा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

बॉर्डर सिक्युरिटी फोर्सने 19 सेकंदाचा थर्मल-इमेजरी फुटेज रिलीझ केलं आहे. ज्यात पाकिस्तानी बंकर नष्ट करण्यात आला आहे.बीएसएफच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी रेंजर्सनी रविवारी फोन करून बीएसएफला गोळीबार रोखण्याची विनंती केली. भारताच्या त्वरीत आणि चोख प्रत्युत्तरामुळे धास्तावलेल्या पाक रेंजर्सला फोन करावा लागला.

भारताने पाकिस्तान विरोधात ही मोठी कारवाई केली आहे. बीएसएफने पाकिस्तानी रेंजवर हल्ला केलाय. या कारवाईचा व्हिडिओ खालीलप्रमाणे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 20, 2018 02:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close