मुख्यमंत्री मुंबईत उपवासाला बसले

या उपोषणात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देशभरातील भाजपचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईत उपोषणाला बसणार आहेत.

Renuka Dhaybar | Updated On: Apr 12, 2018 01:24 PM IST

मुख्यमंत्री मुंबईत उपवासाला बसले

12 एप्रिल : विरोधक गदारोळ घालून सातत्यानं संसदेची कोंडी करत असल्याचा निषेध करण्यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपवास करतायेत. या उपवासात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह देशभरातील भाजपचे सर्व खासदार सहभागी होणार आहेत.

आज देशभर भाजप नेत्यांचा उपवास आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही उपवास केलाय. ते विलेपार्लेमध्ये पोहोचलेत. विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाजाचे बहुतांश दिवस वाया गेलेत. ही बाब जनतेपुढे आणण्यासाठी तसंच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांकडून घातल्या जाणाऱ्या गदारोळाचा विरोध करण्यासाठी हा उपवास केला जाणार आहे.

दरम्यान पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर परिसरात खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, पालकमंत्री गिरीश बापट उपवासाला बसले आहेत. विशेष म्हणजे या तिघांमधलंही सख्य पुणेकरांना सर्वश्रूत आहे. त्यामुळे आजच्या या तिघांना एकत्र उपवासाला बसलेले बघताना भाजप कार्यकर्त्यांना नक्कीच आवडेल.

भाजपा अध्यक्ष अमित शहा हुबळी येथे आंदोलनाला बसणार आहेत. तर मंत्री प्रकाश जावडेकर बंगळूरला, सदानंद गौडा, अनंथ कुमार हे दिल्लीला उपवास उपोषण करणार आहे.

सुरेश प्रभू, मनेका गांधी पटण्याला उपोषण करणार आहेत तर रवी शंकर प्रसादही उपोषणाला बसले आहेत.

 

कुणाचा उपवास कुठे ? 

- अमित शहा - हुबळी

- स्मृती इराणी - अमेठी

- राजनाथ सिंह - लखनौ

- रविशंकर प्रसाद - पाटणा

- मुख्तार अब्बास नक्वी - रांची

- नितीन गडकरी - नवी दिल्ली

- डॉ. हर्ष वर्धन - नवी दिल्ली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2018 08:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close