Home /News /national /

RBI ने बदलले ATM कार्डद्वारे पैसे काढण्याचे नियम

RBI ने बदलले ATM कार्डद्वारे पैसे काढण्याचे नियम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एटीम कार्ड अर्थात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डबाबत नवीन नियम जाहीर केले आहे

    नवी दिल्ली, 16 जानेवारी : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI-Reserve Bank of India) ने एटीम कार्ड अर्थात डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डबाबत नवीन नियम जाहीर केले आहे. आरबीआयने सर्व बँकांना आदेश दिले आहे भारतात ग्राहकांना कार्ड देत असताना  एटीएम आणि PoS वर फक्त भारतात वापरता येईल असेच  डोमेस्टिक कार्डची परवानगी द्या. RBI कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये नवी नियमाबद्दल स्पष्टता करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यासाठी यापुढे वेगळी परवानगी घ्यावी लागणार आहे. यासोबत ऑनलाइन व्यवहार, कॉन्टॅक्टसेस व्यवहार करण्यासाठी ग्राहकांना वेगळी सुविधा घ्यावी लागणार आहे. हा नवीन नियम 16 मार्च, 2020 पासून नवीन कार्डवर लागू होणार आहे. जुन्या कार्डधारकांना कोणती सुविधा ठेवायची आणि कोणती  सुरू करायची आहे याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. RBI चे डेबिट आणि  क्रेडिटसाठी नवीन नियम (1) RBI ने  बँकांना म्हटलंय की, डेबिट आणि क्रेडिट कार्ड देत असताना ग्राहकांना स्थानिक ट्रांझेक्शन करण्याची परवानगी द्यावी. याचा अर्थ स्पष्ट आहे की, गरज नसेल तर एटीएम मशीनमधून काढू न देणे आणि पीओएस ट्रमिनलवर खरेदी करत असताना आंतरराष्ट्रीय व्यवहाराला परवानगी देऊ नये. (2) आंतरराष्ट्रीय व्यवहार, ऑनलाइन खरेदीसाठी ग्राहकांना वेगळ्या सेवेसाठी नोंदणी करावी लागणार आहे. (3) तुमच्याकडे असलेल्या कार्डवर तुम्हाला देशांतर्गत व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवहार करण्याची सुविधा घ्यायची की नाही हे तुम्हाला ठरवावे लागणार आहे. (4) आठवड्याभरात कधीही तुम्ही व्यवहाराची मर्यादा ठरवू शकता आणि यात बदलही करू शकता. म्हणजे, एटीएम कार्डला मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग, एटीएम मशीनवर जाऊन आईवीआरद्वारे कधीही पैसे काढण्याची मर्यादा ठरवू शकता. (5) RBI ने प्रसिद्ध केलेले नवीन नियम हे एटीएम कार्ड आणि क्रेडिट कार्डसाठी16 मार्च 2020 पासून लागू होतील. (6) RBI चे नवीन नियम हे प्रिपेड गिफ्ट कार्डवर लागू होणार नाही.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या