मोदींच्या चाणक्याने प्रियांका गांधींबद्दल केले महत्त्वाचे विधान, उद्धव ठाकरेंच्या भेटीचा केला खुलासा

मोदींच्या चाणक्याने प्रियांका गांधींबद्दल केले महत्त्वाचे विधान, उद्धव ठाकरेंच्या भेटीचा केला खुलासा

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार राहतील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी: आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचा कोणताही प्रभाव पडणार नाही, असे मत जनता दल संयुक्तचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट का घेतली याबाबत किशोर यांनी खुलासा केला.

उत्तर प्रदेशमधील लखनऊमध्ये आज प्रियांका गांधी यांनी रॅली आयोजित करून काँग्रेसचे शक्तीप्रदर्शन करत आहेत. अशाच वेळी प्रशांत किशोर यांनी प्रियांका गांधींबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे. प्रियांकांचा फार प्रभाव पडणार नाही. पण येणाऱ्या काळात एक मोठा चेहरा म्हणून त्या पुढे येतील असे किशोर म्हणाले.

यासाठी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

शिवसेना हा संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील एक घटकपक्ष आहे. यासाठी त्यांची भेट घेतली होती. त्याच बरोबर मुंबईत असलेल्या उत्तर भारतीय नागरिकांना सुरक्षा मिळाली पाहिजे, हे देखील भेटी मागचे कारण होते. ठाकरे यांनी उत्तर भारतीय नागरिकांच्या सुरक्षेची हमी दिल्याचे ते म्हणाले.

मोदीच पंतप्रधानपदाचे उमेदवार

आगामी लोकसभेसाठी एनडीएकडून नरेंद्र मोदींच्या ऐवजी दुसरा उमेदवार पंतप्रधानपदासाठी उभा करणार नाही. नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील. मोदींवरून एनडीएमध्ये मतभेद नाहीत. तसेच नितीश कुमार हे देखील एनडीएमधील मोठे नेते आहेत असंही ते म्हणाले.भाजपनंतर शिवसेना हाच एनडीएमधील मोठा पक्ष आहे त्यानंतर जेडीयु मोठा पक्ष असल्याचे किशोर म्हणाले. आगामी विधानसभा निवडणुकीत मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार राहतील असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

First published: February 11, 2019, 6:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading