खूशखबर! 5 जानेवारीनंतर आज पेट्रोल-डिझेलचे दर झाले कमी

खूशखबर! 5 जानेवारीनंतर आज पेट्रोल-डिझेलचे दर झाले कमी

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेले 6 दिवस काही बदल झाले नाहीत. 5 जानेवारीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले.

  • Share this:

मुंबई, 29 जानेवारी : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेले 6 दिवस काही बदल झाले नाहीत. 5 जानेवारीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर  कमी झाले. पेट्रोलचे दर 8-9 पैसे तर डिझेलचे दर 11 पैशानं कमी झालेत. दिल्लीत एक लीटर पेट्रोलचा दर 71.19 रुपये आहे, तर डिझेलचा 65.89 रुपये प्रति लीटर भावानं आहे.

आजचे नवे दर

दिल्ली

पेट्रोल: 71.19 रुपये प्रति लीटर

डीजल: 65.89 रुपये प्रति लीटर

मुंबई

पेट्रोल: 76.82 रुपये प्रति लीटर

डीजल: 69 रुपये प्रति लीटर

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेल दरात होणाऱ्या बदलांचा परिणाम भारतीय बाजारात होतो.

पेट्रोल-डिझेलचे दर का झाले होते कमी?

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या कमी होणाऱ्या किमती हे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याचं मुख्य कारण आहे. मागील एका महिन्यात कच्च्या तेलाचे दर 40 टक्क्यांनी दर कमी झाले आहेत. तसंच लिबियाकडून अलिकडच्या काळात कच्च्या तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलं आहे.

ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाचे दर 84 डॉलर प्रतिबॅरल एवढे होते. आता हेच दर 55 डॉलर प्रतिबॅरल इतके घसरले आहेत.

जर तुमच्याकडे कार किंवा बाईक असेल तर तुम्ही नेहमी पेट्रोल पंपावर जात असाल. पण पेट्रोल पंपावर अशा काही सुविधा आहे ज्यासाठी तुम्हाला एकही पैसा मोजावा लागणार नाही. प्रत्येक पेट्रोल पंप त्यांच्या ग्राहकांना काही सुविधा आणि वस्तू मोफत देत असतात. आणि त्यांच्या उपभोग करणं प्रत्येक ग्राहकाचा अधिकार आहे.

1.प्रत्येक पेट्रोल पंपावर गाडीच्या चाकातील हवा चेक करण्याची सुविधा मोफत दिली जाते.

2.जर तुम्हाला कोणाला इमरजन्सी कॉल करायचा असेल तर कोणत्याही पेट्रोल पंपावर तुम्ही करू शकता. त्यासाठी पैसे आकारले जाणार नाहीत.

3. खरंतर प्रत्येक ठिकाणी पाणपोई असतेच पण ती पेट्रोल पंपावरदेखील असते. त्यामुळे पाण्याची बाटली विकत घेण्यापेक्षा पेट्रोल पंपावर मोफत पाणी पिता येईल.

4. प्रत्येक पेट्रोल पंपावर फर्स्ट एड बॉक्स असणं महत्त्वाचं आहे.

5. पेट्रोल पंपावर शौचालयाची सुविधा मोफत देण्यात आली आहे. त्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाहीत.

VIDEO : सरकारने जाहीर केलेल्या मदतीवर राजू शेट्टींनी व्यक्त केली 'ही' शंका

First published: January 29, 2019, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading