S M L

पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी नाही तर 1 पैशांची घट, इंधन कंपन्यांकडून तांत्रिक चूक झाल्याचं स्पष्टीकरण

पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 16 दिवसांपासून गगणाला भिडले होते पण अखेर इतक्या दिवसांनंतर इंधनाच्या दरात घट झाली आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 30, 2018 12:44 PM IST

पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी नाही तर 1 पैशांची घट, इंधन कंपन्यांकडून तांत्रिक चूक झाल्याचं स्पष्टीकरण

मुंबई, ता. 30 मे : पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या 16 दिवसांपासून गगणाला भिडले होते पण अनेक दिवसांनंतर इंधनाच्या दरात घट झाली आहे. पण 59 पैशांनी नाही तर फक्त 1 पैशांनी. पेट्रोलच्या दरात ५९ पैशांनी नाही तर 1 पैशांची घट झाली आहे. इंधन कंपन्यांकडून ही तांत्रिक चूक झाल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

दरम्यान, रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने सर्वसामान्य हैराण झालेत. यावर उपाय म्हणून सरकारने इंधनाचे वायदे बाजारात व्यवहार सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. म्हणजे आपल्याला महिनाभरानंतर लागणारे इंधन आजच्या भावात खरेदी करून ठेवता येणार आहे. त्यामुळे दरवाढ झाल्यास त्याचा फटका बसणार नाही. वाढत्या दरांना नियंत्रणात आणण्यासाठी हे व्यवहार इंडियन कमोडिटी एक्स्चेंजमध्ये करण्यास पेट्रोलियम मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची भाजी-पाल्यांवरही पहायला मिळाला. कारण नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर काल 20 ते 30 टक्क्यांनी वाढले होते. इंधन दरवाढीचा थेट परीणाम वाहतूकीवर होतोय. अशात कडाक्याच्या उन्हामुळं भाज्यांची आवक देखील कमी झालीय. त्यामुळं भाज्यांच्या दरात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ झालीय.मुंबईला भाजी पुरवठा करणाऱ्या पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात उन्हाची झळ वाढलीय. त्यामुळे भाज्यांचं उत्पादन देखील कमी झालंय. त्यातच डिझेल, पेट्रोल चे भाव ही वाढल्याने वाहतूकदारांनी आपल्या दरात 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 30, 2018 08:29 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close