Home /News /national /

मोठी बातमी! पाकची कोंडी केल्यामुळे शस्त्रास्त्रांसाठी दहशतवाद्यांनी मोर्चा वळवला बिहारकडे

मोठी बातमी! पाकची कोंडी केल्यामुळे शस्त्रास्त्रांसाठी दहशतवाद्यांनी मोर्चा वळवला बिहारकडे

जम्मूतील कुंजवानी भागातून अटक करण्यात आलेल्या लष्कर-ए-मुस्तफाचा कमांडर हिदायतुल्लाह मलिकने (hidayatullah malik) चौकशीदरम्यान मोठा खुलासा केला आहे.

जम्मू,15 फेब्रुवारी  :  जम्मू आणि काश्मीरमध्ये हिंसा घडवण्यासाठी दहशतवाद्यांना (Terrorist organisations) सीमावर्ती भागातून पाकिस्तानातून (Pakistan) हत्यारं उपलब्ध होत होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून भारतीय सैन्य दल आणि स्थानिक प्रशासनाने या भागात सुरक्षाव्यवस्था आणि तपासणी अधिक कडक केल्याने शस्त्रांची तस्करी रोखली गेली आहे. त्यामुळे दहशतवाद्यांना सहजासहजी शस्त्र उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. याचा परिणाम म्हणून आता दहशतवागी संघटनांनी शस्त्रास्त्रांसाठी आपला मोर्चा बिहारमध्ये (Bihar for weapons) वळवल्याचं नवं चित्र समोर आलं आहे. जागरणच्या वृत्तानुसार, काश्मीरमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनांनी आता पाकिस्ताननंतर बिहारमधून शस्रास्त्रं खरेदी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. जम्मूतील कुंजवानी भागातून अटक करण्यात आलेल्या लष्कर-ए-मुस्तफाचा कमांडर हिदायतुल्लाह मलिकने (hidayatullah malik) चौकशीदरम्यान बिहारमधील छपरा येथून सात पिस्तुलं खरेदी केल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. हे वाचा - दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, रघुनाथ मंदिरासह 'ही' ठिकाणं होती निशाण्यावर हिदायतुल्लाने हा खुलासा केल्यानंतर पाकिस्तानमधील काश्मिरी दहशतवादी आशिक नेंगरु पाकिस्तानमधून या हालचाली करीत आहे. आशिक नेंगरु पाकिस्तानमधील भुयारातून (Tunnel) किंवा ड्रोनच्या (Drone) माध्यमातून येणारी शस्रं काश्मीरमधील सांबापर्यंत पोहोचवत होता. मात्र, सीमेवर कडक तपासणी होत असल्याने पाकिस्तानातून शस्रास्र सहजासहजी पोहोचणे अवघड झालं होतं. परिणामी दहशतवाद्यांना शस्रास्रांची कमतरता जाणवू लागली होती. त्यामुळे ते नाईलाजाने बिहार तसेच अन्य राज्यांमधून शस्रास्रांची तस्करी करत होते. ऑक्टोबर 2019 मध्ये नेंगरु अशाच पद्धतीने भुयाराव्दारे परिवारासह पाकिस्तानात दाखल झाला होता. त्यानंतर तेथून तो कारवाया करीत होता. पंजाब किंवा अन्य राज्यांत शिक्षणासाठी गेलेल्या काश्मिरी युवकांचे नेटवर्क तयार करण्याची जबाबदारी नेंगरुवर सोपवण्यात आली होती. अन्य राज्यात दहशतवादी कारवाया करण्याकरिता स्लिपिंग सेल उपलब्ध व्हाव्यात आणि या युवकांमार्फत दहशतवादी कारवाया करणे शक्य व्हावे, यासाठी हे नेटवर्क तयार केले जात होते. नेंदरु व्यतरिक्त हिदायतुल्ला याच्याशी पाकिस्तानमधून अजून एक हॅंडलर संपर्क साधत होता, त्याचे सांकेतिक नाव डॉक्टर असे आहे. एनएसए कार्यालयाची (NSA Office) रेकी हिदायतुल्लाने या डॉक्टरच्या सांगण्यावरुनच केली होती आणि या रेकीचा व्हिडीओ त्याला व्हॉट्सअपवर पाठवला होता.
Published by:Aiman Desai
First published:

Tags: Bihar for weapons, India, Indian army, Jammu kashmir, Pakistan

पुढील बातम्या