S M L

जिसके साथ तेली वो भाग्यशाली तसं माझ्यासोबत मोदी - मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांनी मोदींसोबत असं जोडलं नात...

Renuka Dhaybar | Updated On: Jun 2, 2018 03:11 PM IST

जिसके साथ तेली वो भाग्यशाली तसं माझ्यासोबत मोदी - मुख्यमंत्री

नवी दिल्ली, ता. 02 मे : जिसके साथ तेली वो भाग्यशाली, माझ्यासोबत तेली मोदी आहेत मी भाग्यशाली आहे. असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी तेली समाजाला खुश करण्याच प्रयत्न केला आहे. नवी दिल्लीत तेली समाजाच्या एकता रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

'मला मत देणारे मतदार आणि अनेक मंत्री आमदारही तेली आहेत. मोदींच्या रुपानं देशाला सर्वात लोकप्रिय पंतप्रधान हा तेली समाजानं दिला आहे.' असंही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. त्याचबरोबर आम्ही ओबीसी समर्थक आहोत आणि मी तेली समाजाची वकिली करेल असंही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे.

दरम्यान, ओबीसी आणि तेली समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज दिल्लीत अखिल भारतीय "तेली एकता रॅली"चं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीसाठी महाराष्ट्रातून हजारो तेली बांधव दिल्लीत दाखल झाले होते.

जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली टालकटोरा स्टेडियममध्ये आज दुपारी 12 वाजता जाहीर सभा होणार आहे. देशभरातून 25 हजार तेली, साहू समाज बांधव या रॅलीत सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अरविंद केजरीवाल, प्रफुल पटेल या रॅलीला उपस्थित राहिले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 2, 2018 03:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close