नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण भारतात मान्सूनच्या पावसाने थैमान (Heavy rainfall in india) घातलं आहे. निम्म्याहून अधिक देशातून मान्सून परतला असला तरी बऱ्याच राज्यात मान्सूनचा मुक्काम वाढला (Monsoon in india) आहे. आणखी काही दिवस दक्षिण भारत आणि ईशान्यकडील राज्यात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात म्हणजेच 26 ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यातून मान्सून वापसी (Monsoon withdrawn) होणार आहे. 1975 नंतर देशात पहिल्यांच इतके दिवस मान्सून थांबला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, वायव्य भारतातून मान्सूनने निरोप घेतल्यानंतरही, काही राज्यात अद्याप नैऋत्य मोसमी वारे सक्रिय आहेत. यावर्षी 6 ऑक्टोबर रोजी राजस्थानमधून मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. पण दरम्यान अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला होता. याचा दुहेरी प्रभाव मान्सूनवर पडला आहे. त्यामुळे देशात मान्सूनचा मुक्काम वाढला असून आणखी काही दिवस देशात मान्सूनच्या सरी कोसळणार आहेत.
हेही वाचा-एकही मृत्यूची नोंद नाही, महापौरांच्या प्रतिक्रियेनं उंचावेल पुणेकरांची मान
26 ऑक्टोबर रोजी देशातून मान्सून माघारी परतल्यानंतर, दक्षिण-पूर्व आणि ईशान्य भारतात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. पण याचा कोणताही परिणाम महाराष्ट्रावर होणार नाही. भारतीय हवामान खात्याने पुढील पाचही दिवस राज्यात कोरड्या हवामानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.
हेही वाचा-सब गोलमाल है! हयात नसलेल्या व्यक्तीला मिळाली लस, लसीकरणाचं प्रमाणपत्रही पाठवलं
दुसरीकडे, राज्यात पावसाने उघडीप घेतल्यानंतर कमाल आणि कमान तापमानात चढ-उतार जाणवत आहेत. बुधवारी नागपूर येथे उच्चांकी कमाल 34.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वर येथे राज्यातील सर्वात नीचांकी 15.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.