News18 Lokmat

गोध्रा हत्याकांडात कोर्टाचा मोठा निकाल, 18 वर्षानंतर 2 आरोपींना सुनावली शिक्षा

गोध्रा हत्याकांड प्रकरणात गुजरात कोर्टाने 2 आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर बाकी 3 जणांना पुराव्यांअभावी सोडण्यात आलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2018 01:11 PM IST

गोध्रा हत्याकांडात कोर्टाचा मोठा निकाल, 18 वर्षानंतर 2 आरोपींना सुनावली शिक्षा

गुजरात, 27 ऑगस्ट : गोध्रा हत्याकांड प्रकरणात गुजरात कोर्टाने 2 आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर बाकी 3 जणांना पुराव्यांअभावी सोडण्यात आलं आहे. या प्रकरणाती 5 आरोपी हे फरार होते. त्यांना 2015-16मध्ये त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं होतं. त्यांना आधीच दोषी ठरवण्यात आलं होतं पण आज त्यांच्यावरील शिक्षा सुनावण्यात आली आहे.

27 फेब्रुवारी 2002 साली गोध्रा हत्याकांड झाले होते. साबरमती एक्स्प्रेसच्या 'एस-6' डब्याला 27 फेब्रुवारी 2002ला गोध्रा स्टेशनवर आग लावण्यात आली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये दंगल उसळली होती. या डब्यात 59 प्रवासी होते व त्यातील बहुतांश अयोध्याहून परतणारे कारसेवक होते.

याप्रकरणी एसआयटी कोर्टाने 1 मार्च 2011 रोजी 31 जणांना दोषी ठरवण्यात आले होते तर 63 जणांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. तसेच 11 दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा तर 20 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती. त्यात आता आणखी सहा आरोपींविराधात कोर्टाने निर्णय दिला आहे. यातल्या दोघांना जन्मठेप, 3 जणांची पुराव्याअभावी सुटका तर एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. विशेष कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

 

साखरपुड्यानंतर प्रियांका आणि निक अमेरिकेत करतायत एंजाॅय, फोटोज व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 01:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...