News18 Lokmat

अटलजींच्या निधनाने अवघा देश हळहळला, शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं.

News18 Lokmat | Updated On: Aug 16, 2018 11:28 PM IST

अटलजींच्या निधनाने अवघा देश हळहळला, शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली,ता.16 ऑगस्ट : माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं गुरूवारी सायंकाळी दिल्लीतल्या 'एम्स' हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. अटलजींच्या निधनाने देशभर दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 9 आठवड्यांपासून त्यांच्यावर 'एम्स'मध्ये उपचार सुरू होते. चार दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. वाढतं वय आणि दिर्घ आजारामुळे उपचारांनाही प्रतिसाद देणं त्यांनी बंद केलं होतं. शेवटपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र अटलजींची आजाराशी असलेली झुंज अखेर संपली.

सायंकाळी त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. शुक्रवारी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत भाजपच्या मुख्यालयात पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. दुपारी 2 च्या सुमारास अंत्ययात्रा निघेल आणि सायंकाळी 5 वाजता राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने सात दिवसांचा दुखवटा जाहीर केलाय. जगभरातून अटलींच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.

94 वर्षांचे वाजपेयी हे गेल्या काही वर्षांपासून डिमेंशियाने आजारी होते. प्रकृती अस्वस्थतेमुळं वाजपेयी यांनी सार्वजनिक जिवनातून निवृत्तीही घेतली होती. भाजपचे संस्थापक सदस्य असलेल्या वाजपेयींनी तीन वेळा देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते बिगर काँग्रेस पक्षाचे पहिलेच नेते होते.

VIDEO: वाजपेयींच्या तब्येतीबद्दल ऐकून ढसाढसा रडली नात

Loading...

वाजपेयींच्या भाचीचा हा VIDEO पाहून तुम्हालाही होतील अश्रू अनावर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 16, 2018 05:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...