BREAKING : दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी लागली आग

BREAKING : दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी लागली आग

7 लोककल्याण मार्ग यावर असणाऱ्या पंतप्रधानांच्या निवासस्थानीच आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : पंतप्रधान कार्यालयाला आग लागली असल्याची मोठी बातमी दिल्लीतून येते आहे. PMO अर्थात पंतप्रधान कार्यालयाला संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागली. सध्या तिथे अग्निशमन दलाच्या 9 गाड्या पोहोचल्या आहेत. अर्ध्या तासाच्या आत आग नियंत्रणात आल्याची बातमी आली आहे.

7, लोककल्याण मार्ग यावर असणाऱ्या पंतप्रधानांच्या निवासस्थानीच आग लागल्याने खळबळ उडाली आहे. या आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत निवासस्थानी नेहमीच दक्षता म्हणून आपत्कालीन सेवा उपलब्ध असतात. अग्निशमन दलाच्या काही गाड्या 7, लोककल्याण मार्गावर नेहमी तैनात असतात. त्यामुळे आग लागल्याची बातमी मिळताच तातडीने आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

आग किती मोठी आहे आणि कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग फार मोठी नाही. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पंतप्रधान कार्यालयाकडून या आगीच्या घटनेबद्दल ट्वीट करण्यात आलं आहे. ही आग किरकोळ स्वरूपाची असून नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं PMO कडून सांगण्यात आलं आहे.

आग लागली तो भाग पंतप्रधान मोदी यांच्या राहण्याच्या ठिकाणापासून दूर आहे आणि त्यांचं कार्यालयही तिथून सुरक्षित अंतरावर आहे, असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे.

ही आग आता आटोक्यात आली असल्याची माहिती आत्ता मिळाली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास ही आग लागली होती. अर्ध्या तासात ही आग नियंत्रणात आणल्याची माहिती मिळाली आहे.

--------------------

अन्य बातम्या

Explainer : पाकिस्तान युद्धानंतरचा इंदिरा गांधींचा प्लॅन मोदी सरकारने केला पूर्ण

याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारा आमदार ठाकरेंच्या मंत्रिमंडळात

मंत्रिमंडळ विस्तारानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, शपथविधीवर म्हणाले...

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: December 30, 2019, 7:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading