शपथविधीविरोधात काँग्रेसची विधानभवनाबाहेर निदर्शनं, राहुल गांधींही ट्विटरवरून आक्रमक

शपथविधीविरोधात काँग्रेसची विधानभवनाबाहेर निदर्शनं, राहुल गांधींही ट्विटरवरून आक्रमक

येडियुरप्पा यांचा राजभवनात शपथविधी सुरू असताना काँग्रेसने कर्नाटक विधान भवनाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यांनी या शपथविधीचा निशेष केला आहे.

  • Share this:

17 मे : कर्टनाटकच्या मुख्यमंत्रीपदी भाजपचे बी. एस. येडियुरप्पा यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बंगळुरूमधल्या राजभवानात हा शपथविधी सोहळा पार पडला. राजभवनात झालेल्या समारंभात राज्यपाल वासुभाई वाला यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. पण दरम्यान इतर कोणत्याही नेत्याने, येडियुरप्पा यांच्यासह मंत्रीपदासाठी शपथ घेतली नाही.

येडियुरप्पा यांचा राजभवनात शपथविधी सुरू असताना काँग्रेसने कर्नाटक विधान भवनाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली. त्यांनी या शपथविधीचा निशेष केला आहे. जोरदार घोषणाबाजी करत काँग्रेस आणि जेडीएसचं धरणं आंदोलन केलं आहे. येडियुरप्पा यांच्या शपथविधीच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं आहे.

 

ही शपथविधी पार पडताच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून भाजपवर टीका केली आहे. 'बहुमत नसताना भाजप सरकार स्थापन करतंय. भाजप संविधानाची खिल्ली उडवत आहे.' अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

'भाजप आज विजयी जल्लोष करेल, तर दुसरीकडे संपूर्ण देशाला लोकशाहीच्या पराभवाचं दुःख असेल', असं ट्वीट राहुल गांधींनी केलं आहे.

दरम्यान, भाजप राज्यघटनेलाही मानायला तयार नसल्याची टीका सिद्धरामय्या यांनी केली आहे. तर भाजप बहुमत सिद्ध करू शकत नसल्याचा दावाही सिद्धरामय्यांनी केला आहे.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2018 10:48 AM IST

ताज्या बातम्या