S M L

नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न ठरला फोल, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. हे पाचही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते.

Renuka Dhaybar | Updated On: Jun 10, 2018 11:23 AM IST

नियंत्रण रेषेवरून घुसखोरी करण्याचा प्रयत्न ठरला फोल, 5 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर, 10 जून : काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर 5 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. हे पाचही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. केरान सेक्टरमध्ये लष्करानं त्यांना ठार केलं आहे. कुपवाडापासून 94 किलोमीटरवर केरान आहे. नियंत्रण रेषेवर असल्यामुळे हा संवेदनशील भाग मानला जातो.

संरक्षण प्रवक्त्यांनी याबाबत निवेदन जारी केले की, कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर घुसण्याचा प्रयत्न फोल ठरवला. त्यांनी सांगितले की सीमेपलीकडील घुसखोर करणाऱ्या पाच दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. ही कारवाई अद्याप सुरूच आहे.

दरम्यान, रमजानच्या महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये कोणतेही दहशतवादी हल्ले न करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते, पण पाकिस्तानकडून वारंवार घुसखोरी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 10, 2018 11:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close