अयोध्येतल्या राम मंदिराचं स्वप्न साकारतंय याचं श्रेय लतादीदींनी दिलं 2 नेत्यांना

अयोध्येतल्या राम मंदिराचं स्वप्न साकारतंय याचं श्रेय लतादीदींनी दिलं 2 नेत्यांना

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतील राममंदिराचा भूमिपूजन (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) सोहळा झाला. लता मंगेशकर यांनी याचं श्रेय दोन नेत्यांना दिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 ऑगस्ट : अयोध्येत राममंदिर (Ayodhya Ram Mandir) हे कित्येक वर्षांचं स्वप्नं आज प्रत्यक्षात साकारताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राममंदिराचा भूमिपूजन (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan) सोहळा झाला. देशातील प्रत्येकाला याचा आनंद होतो आहे. भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीदेखील याबाबत आनंद व्यक्त केला आहे.

अयोध्येतील राममंदिराचं श्रेय लतादीदींनी दोन नेत्यांना दिलं आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यामुळे कित्येक वर्षांचं स्वप्नं साकार होत असल्याचं लतादीदी म्हणाल्यात. त्यांनी याबाबत ट्वीट केलं आहे.

लता मंगेशकर ट्वीटमध्ये म्हणाल्या, "कित्येक राज्यकर्ते, कित्येक पिढ्या आणि अखिल विश्वातील रामभक्ताचं स्वप्नं आज साकार होताना दिसत आहे. कित्येक वर्षांच्या वनवासानंतर आज अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं पुननिर्माण होत आहे, कोनशिला बसवली जाते आहे. याचं सर्वाधिक श्रेय माननीय लालकृष्ण अडवाणींना जातं कारण त्यांंनी या मुद्द्यावर रथयात्रा काढून संपूर्ण देशभरात जनजागृती केली होती. तसंच माननील बाळासाहेब ठाकरेंना याचं श्रेय जातं आहे"

हे वाचा - VIDEO : मोदींचा साष्टांग नमस्कार सोशल मीडियावर VIRAL

"कोरोनामुळे आज भलेही लाखो रामभक्त अयोध्येत जाऊ शकले नाही मात्र त्यांचं मन आणि ध्यान श्रीरामांच्या चरणीच असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हा सोहळा झाला, याचाही आनंद मला आहे. आज मी, माझं कुटुंब आणि संपूर्ण जग खूप आनंदात आहे आणि आज प्रत्येक हृदय, प्रत्येक श्वास जय श्रीराम बोलतो आहे, असंच वाटतं आहे", असं लता मंगेशकर म्हणाल्या.

हे वाचा - अयोध्या लढ्यात प्रत्यक्ष सहभाग असणाऱ्यांनाच भूमिपूजनाचं निमंत्रण, ठाकरेंना टोला

रामनगरी अयोध्येत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राममंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. भूमिपूजन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचे मुख्य पुजारी श्री गद्दीनशीन प्रेमदास महाराज यांच्यासोबत हनुमानाचं दर्शन घेतलं. मोदींसह यावेळी पूजेला सरसंघचालक मोहन भागवतही बसले होते.

Published by: Priya Lad
First published: August 5, 2020, 4:01 PM IST

ताज्या बातम्या