Elec-widget

पंतप्रधान मोदींनी वाचलेल्या कवितेला लता दीदींच्या स्वरांचा साज

पंतप्रधान मोदींनी वाचलेल्या कवितेला लता दीदींच्या स्वरांचा साज

भारतीय वायूदलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर राजस्थान येथे झालेल्या एका महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सौगंध मुझे इस मिट्टी की' ही कविता वाचली होती.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये भारतीय  हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राईकनंतर राजस्थान येथे झालेल्या एका महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सौगंध मुझे इस मिट्टी की' ही कविता वाचली होती. या कवितेला आता स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलं आहे. आपल्या आवाजातील हे गाणं लता दीदींनी ट्विटरवर शेअर केलं आहे.Loading...

लता मंगेशकर यांनी हे गाणं शेअर करताना संगितलं, 'काही दिवसांपूर्वीच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकत होते. या भाषणात त्यांनी एका कवितेच्या काही ओळी वाचल्या. त्या ओळी मला प्रत्येक भारतीयाच्या मनातील गोष्ट वाटली. ही कविता मला खूप आवडली आणि मी ती माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. आज मी रेकॉर्ड केलेली ही कविता देशाचे वीर जवान अणि जनतेला समर्पित करते.' लता मंगेशकर यांच्या या ट्विटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं, 'अंतःकरणापासून या गाण्याच्या रुपातून मिळालेलं तुमचं प्रेम आणि आशिर्वाद माझ्यासाठी प्रेरणास्रोत आहे.'


'सौगंध मुझे इस मिट्टी की' ही कविता बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी लिहिली आहे. लता मंगेशकर यांनी आवाज दिलेली ही कविता 2014च्या लोकसभा निवडणुकीत थीम साँग म्हणून वापरण्यात आली होती आणि थीम साँगच्या सुरूवातीच्या ओळींना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आवाज दिला होता.


पाहा : VIDEO : बीडमधील गुंडगिरीच्या आरोपाबद्दल पहिल्यांदाच बोलल्या पंकजा मुंडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 09:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...