'हे' होते सुषमा स्वराज यांचे अखेरचे शब्द

उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज यांनी आपल्या भाषणांनी संसदेत अमीट छाप सोडली होती.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 12:05 AM IST

'हे' होते सुषमा स्वराज यांचे अखेरचे शब्द

नवी दिल्ली 6 ऑगस्ट :  माजी परराष्ट्रमंत्री भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने मंगळवारी रात्री निधन झालं. त्या 67 वर्षांच्या होत्या. किडनीच्या विकाराने त्या त्रस्त असल्या तरी त्यांची प्रकृती मंगळवारी रात्रीपर्यंत ठणठणीत होती. मात्र रात्री त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. लोकसभेत कलम 370 रद्द करणारं विधेयक मंजूर झाल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करणारं ट्विट केलं. मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी हे त्यांचे अखेरचे शब्द होते.

Loading...

उत्कृष्ट वक्त्या, प्रभावी संसदपटू, कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी असलेल्या सुषमा स्वराज भाजपच्या पहिल्या फळीतल्या नेत्यांमध्ये अतिशय सक्रिय होत्या. त्यांनी आपल्या भाषणांनी संसदेत अमीट छाप सोडली होती. परराष्ट्रमंत्री असताना ट्विटरवर त्या अतिशय सक्रिय होत्या. आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला नवा आकार देण्यासाठी कठोर मेहेनत घेतली. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी जगभरात अडचणीत सापडलेल्या भारतीयांना मदत केली. त्याचा शेकडो लोकांना फायदा झाला.

काही वर्षांपूर्वी त्यांच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्यांची सक्रियता थोडी कमी झाली. यापुढे निवडणूक लढविणार नाही अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी मंत्रिपदही घेतलं नव्हतं. लोकसभेच्या त्या सात वेळा खासदार होत्या. 1977मध्ये त्या वयाच्या 25 व्या वर्षी हरिणात पहिल्यांदा मंत्री झाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 7, 2019 12:05 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...