मराठी बातम्या /बातम्या /देश /अवघ्या 32 व्या वर्षीय उद्योजक पंखुडी श्रीवास्तवचा मृत्यू; शेवटची पोस्ट होतेय प्रचंड व्हायरल

अवघ्या 32 व्या वर्षीय उद्योजक पंखुडी श्रीवास्तवचा मृत्यू; शेवटची पोस्ट होतेय प्रचंड व्हायरल

 पंखुडी श्रीवास्तवची शेवटची पोस्ट

पंखुडी श्रीवास्तवची शेवटची पोस्ट

पंखुडी अवघी 32 वर्षांची होती. तिच्या निधनानं सगळ्या स्टार्टअप जगताला धक्का बसला असून, या क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

    मुंबई, 28 डिसेंबर:  गेल्या काही वर्षांत आपल्या देशात स्टार्टअप्स (Startups) म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे नाविन्यपूर्ण उत्पादन किंवा सेवा देणारे उद्योग झपाट्याने वाढत असून, तरुण बुद्धिमान पिढी यात आघाडीवर आहे. यामुळे स्टार्टअप्सची एक नवी परिसंस्थाच (Ecosystem) देशात उभी राहिली आहे. या स्टार्टअपच्या जगात अगदी लहान वयात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या पंखुडी श्रीवास्तव (Pankhuri Shrivastava) हिचं 24 डिसेंबर 21 रोजी हृदयविकाराच्या (Cardiac Arrest) झटक्याने अकस्मात निधन झालं. पंखुडी अवघी 32 वर्षांची होती. तिच्या निधनानं सगळ्या स्टार्टअप जगताला धक्का बसला असून, या क्षेत्रात शोककळा पसरली आहे. मनीकंट्रोलनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    अनेक दिग्गज उद्योजकांनी हा धक्का पचवणे कठीण असल्याची भावना व्यक्त केली आहे. अतिशय सर्जनशील, बुद्धीमान, धडाडीची उद्योजिका असणाऱ्या पंखुडी श्रीवास्तवचं इतक्या लहान वयात जगाचा निरोप घेणं अनेकांना भावव्याकूळ करून गेलं आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच तिचं लग्न झालं होतं आणि 2 डिसेंबर 21 रोजी तिनं लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला होता. सोशल मीडियावर तिनं तिच्या पतीसोबतचा फोटोही पोस्ट केला होता. तसंच मृत्यूपूर्वी एक दिवस आधी तिनं सोशल मीडियावर नोकरीसाठी उमेदवारांच्या निवडीबाबत एक पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट आता व्हायरल झाली असून, सगळीकडे त्याचीच चर्चा आहे.

    पंखुडी श्रीवास्तव हिनं तिच्या मृत्यूच्या एक दिवस आधी सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये नोकरीसाठी आलेल्या उमेदवारांचे मूल्यांकन मुलाखतीद्वारे करताना येणाऱ्या आव्हानांबद्दल सांगितलं होतं.

    12वी उत्तीर्णांनो, Infosys कंपनीत तुमच्यासाठी Internship ची मोठी संधी; अशा पद्धतीनं लगेच करा अप्लाय

    'ही फक्त मीच आहे का की जिला 1 तासाच्या मुलाखतीत उमेदवाराच्या क्षमतेचं मूल्यांकन करणं कठीण वाटत आहे. मुलाखतीला आलेल्या सर्व उमेदवारांनी समान लेख वाचलेले असतात. सगळे एकाच प्रकारची भाषा बोलत असतात. चांगल्या चालणाऱ्या कंपन्यांबाबत सर्वांनी माहिती घेतलेली असते आणि तिच ते सांगत असतात, असं वाटतं. अशावेळी योग्य निवडीसाठी फक्त संदर्भ तपासणं हा एकमेव मार्ग आहे का?' असं तिनं आपल्या 23 डिसेंबरच्या ट्विटरवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं.

    पंखुडी श्रीवास्तवनं 2019 मध्ये 'पंखुडी' (Pankhuri) हा महिला-केंद्रित सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि ग्रॅबहाऊस (Grabhouse) ही कंपनी स्थापन केली होती. 2012 मध्ये तिनं प्रथम रेंटल स्टार्टअप ग्रॅबहाऊसची स्थापना केली होती. यानंतर 2016 मध्ये क्विकर या क्लासिफाइड कंपनीनं ती विकत घेतली. त्यानंतर 2019 मध्ये तिने महिलांवर लक्ष केंद्रित करत पंखुडी हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरू केला. या प्लॅटफॉर्मद्वारे, ती सदस्यांना विविध अभ्यासक्रम, तज्ज्ञ व्यक्तींशी संवाद साधण्याची संधी देत असे, तसंच कौशल्य विकासासाठीही मदत करत असे. या नावीन्यपूर्ण संकल्पनेवरील प्लॅटफॉर्मद्वारे तिनं सिकोइया इंडिया, इंडिया कोशंट (India Quotient), टॉरस व्हेंचर्स (Taurus Ventures) आदी विविध गुंतवणूकदार कंपन्यांकडून 3.2 दशलक्ष डॉलर्सचे भांडवल मिळवले होते.

    पंखुडी श्रीवास्तवच्या (Pankhuri Shrivastava) निधनानं व्यथित झालेले सिकोइया इंडियाचे (Sequoia Capital India) व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र सिंग यांनी ट्विटरवर तिला श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'पंखुडीकडे अनेक नावीन्यपूर्ण कल्पना होत्या, एक संस्थापक म्हणून ती खूप उत्साही आणि सर्जनशील होती. तिच्या अचानक झालेल्या निधनानं मोठं नुकसान झालं असून, ते भरून काढणं शक्य नाही,' असं त्यांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे.

    First published:
    top videos

      Tags: India, Viral post