एअर मार्शल अर्जन सिंग यांना दिला अखेरचा निरोप

एअर मार्शल अर्जन सिंग यांना दिला अखेरचा निरोप

ब्रार चौकात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • Share this:

नवी दिल्ली,18 सप्टेंबर: भारतीय वायुदलाचे मार्शल अर्जन सिंग यांच्यावर दिल्लीत  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.  शनिवीरी  त्यांचं निधन झालं होतं. ते मृत्यूसमयी ९८ वर्षांचे होते.

आज सकाळी 8 वाजता 7 ए कौटिल्य मार्ग या त्यांच्या निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. या अंत्ययात्रेत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, लालकृष्ण आडवाणी यांच्यासह अनेक दिग्गज  सहभागी झाले. त्यांना 17 तोफांची सलामी देण्यात आली.  ब्रार चौकात त्यांच्या पार्थिवावर  अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जन सिंग यांना वायुदलाकडून मार्शल ही पदवी दिली गेली होती. ही पदवी तहहयात असते. फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या पदासारखंच हे पद आहे. या पदामुळे तहहयात गणवेश धारण करता येतो. अर्जन सिंह हे १९६९ साली वायुदलातून निवृत्त झाले. १९६५च्या युद्धात ते वायुदलाचे प्रमुख होते. २०१६ साली वायुदलानं पश्चिम बंगालमधल्या पानागड तळाचं नाव एअर फोर्स स्टेशन अर्जन सिंग असं ठेवण्यात आलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 18, 2017 10:55 AM IST

ताज्या बातम्या