मराठी बातम्या /बातम्या /देश /

गुरं पाळणाऱ्यांना 5 लाख जिंकण्याची संधी, अर्ज करण्यासाठी उरले अखेरचे काही तास

गुरं पाळणाऱ्यांना 5 लाख जिंकण्याची संधी, अर्ज करण्यासाठी उरले अखेरचे काही तास

देशातील पशूपालनाला (Animal Husbandry) चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं (Union Government) काही पुरस्कार (Awards) देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  desk news

नवी दिल्ली, 15 सप्टेंबर : देशातील पशूपालनाला (Animal Husbandry) चालना देण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं (Union Government) काही पुरस्कार (Awards) देण्याचा निर्णय घेतला आहे. तीन श्रेणींमध्ये (Three Categories) हे पुरस्कार देण्यात येणार असून त्याला पात्र ठरण्यासाठी पशुपालकांनी अर्ज (Application) करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे. हे अर्ज करण्यासाठीची अंतिम मुदत ही 15 सप्टेंबर असल्यामुळे अखेरचे काही तास उरले आहेत.

तीन श्रेणीत मिळणार पुरस्कार

हे पुरस्कार तीन श्रेणीत दिले जाणार असून पहिल्या क्रमांकासाठी 5 लाख रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 3 लाख रुपये, तर तिसऱ्या क्रमांकासाठी 2 लाख रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. या पुरस्कारांसाठी तुम्ही पात्र असाल मात्र अर्ज केला नसेल, तर अखेरच्या काही तासांतही तुम्ही अर्ज करू शकता.

कुणासाठी आहे पुरस्कार?

देशातील दुग्ध उत्पादन प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या शेतकऱ्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणं सर्वश्रेष्ठ कृत्रिम गर्भधारणा क्षेत्रातील कामगिरीसाठी आणि सहकारी किंवा खासगी दूध उत्पादक कंपन्यांनी मान्यता दिलेल्या 50 जातींपैकी कुठल्याही गायीचं उत्तम संगोपन करण्यासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत. सर्वश्रेष्ठ कृत्रिम गर्भधारणा तंत्रज्ञ पुरस्कारासाठी 90 दिवसांचं प्रशिक्षण त्या व्यक्तीनं पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे.

हे वाचा -पेट्रोल ओतून पतीला पेटवलं; मग दगडानं ठेचून हत्या, सांगितलं धक्कादायक कारण

असा करा अर्ज

गोपालरत्न पुरस्कार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. 15 सप्टेंबरचा दिवस संपेपर्यंत या पुरस्कारासाठी अर्ज करता येणार आहेत. सध्या यासाठी ऑनलाईन अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे अर्ज केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाकडून मागवण्यात आले आहेत. www.dahd.nic.in या लिंकवर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येईल. मंत्रालयाच्या 011-23383479 या फोन नंबरवरूनदेखील पशुपालक याबाबत सविस्तर माहिती घेऊ शकतात.

First published:

Tags: Central government, Cow science, Pet animal