S M L

आज इनकम टॅक्स फाइल केलं नाही तर...

आयकर भरला नाही तर फार काही फरक पडत नाही अशाच आविर्भावात अनेकजण असतात

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2018 12:50 PM IST

आज इनकम टॅक्स फाइल केलं नाही तर...

नवी दिल्ली, ३१ ऑगस्ट- आयकर भरला नाही तर फार काही फरक पडत नाही अशाच आविर्भावात अनेकजण असतात. मात्र जर वेळीच आयकर भरला नाही तर नंतर पुन्हा आयकर भरता येत नाही.

आयकर भरायची शेवटची तारीख काय?

आयकर न भरण्यानंतर होणाऱ्या नुकसानाबद्दल बोलण्याआधी तुम्हाला आयकर भरण्यासाठी देण्यात आलेल्या शेवटच्या तारखेबद्दल आधी समजून घेऊ. नोकरदार वर्गासाठी ३१ ऑगस्ट ही शेवटची तारीख असते. पण जर तुमचा कोणता व्यवसाय असेल आणि तुमचं बँकेचं अकाऊंट ऑडिटमध्ये येत असेल तर त्या व्यक्तींसाठी ३० सप्टेंबर ही कर भरण्याची शेवटची तारीख असते. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे.जर दिलेल्या मुदतीत कर भरला नाही तर?

जर तुम्ही ३१ ऑगस्टपर्यंत आयकर भरला नाही तर तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे २०१९ च्या ३१ मार्चला पुन्हा आयकर भरू शकता. पण तेव्हाही जर तुम्ही आयकर भरला नाही तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा भरण्याची संधी मिळत नाही. तसेच जर तुम्ही दिलेल्या मुदतीत आयकर भरला नाही तर त्या वर्षी व्यवसायात झालेल्या नुकसानाची भरपाई तुम्हाला मिळत नाही. अनेकदा व्यावसायिक वर्षभरात झालेले नुकसान आयकरमध्ये दाखवून त्याची भरपाई घेतात. पण जर तुम्ही वेळीच आयकर बरलानाही तर ही नुकसान भरपाई मिळत नाही. तसेच उशीरा आयकर भरल्यामुळे तुम्हाला रिफंडवरचा इंटरेस्टही मिळत नाही. हे कमी की काय तुम्हाला उशीरा आयकर भरल्याचा दंडही भरावा लागतो. ३१ ऑगस्टपर्यंत तुम्ही आयकर भरला नाही तर तुम्हाला दंड हा भरावाच लागतो. हा दंड तुमची एकूण मिळकत आणि तुम्ही आयकर कधी भरला त्याच्यावर अवलंबून असतो.

ऑगस्ट ३१ नंतर आणि ३१ डिसेंबरच्या आधी जर तुम्ही कर भरला तर तुम्हाला ५ हजार रुपये दंड भरावा लागतो. पण त्यानंतर कर भरला तर दंडाची रक्कम १० हजार रुपये होते. पण जर तुमची मिळकत ५ लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्हाला १ हजार रुपये दंड भरावा लागतो.

Loading...
Loading...

३१ मार्च पर्यंतही कर भरला नाही तर?

२०१९ च्या ३१ मार्चपर्यंतही आयकर भरला नाही तर आयकर विभागाला याबद्दल माहिती मिळते. यानंतर आयकर विभाग तुम्हाला तुमच्या मिळकतीच्या ५० टक्के एवढ्या रक्कमेचा दंड आकारतो. त्यामुळे अतिरिक्त दंड भरण्यापेक्षा वेळीच आयकर भरलेला कधीही योग्य

VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2018 12:50 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close