'धूम' सिनेमातील बाइक खरेदी करण्याची शेवटची संधी, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

'धूम' सिनेमातील बाइक खरेदी करण्याची शेवटची संधी, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

  • Share this:

नवी दिल्ली, 18 डिसेंबर : बॉलिवूडच्या धूम सिनेमा तुम्हाला आठवतो का? हा सिनेमा चांगलाच सुपरहीट ठरला होता. या सिनेमात  तुम्ही जॉन अब्राहमकडे एक बाइक पाहिली असेल. या बाइकनेही त्यावेळी चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. या बाइकचं नाव आहे Suzuki Hayabusa. आता सुझुकीने या बाइकचा शेवटचा आणि लिमिटेड लॉट विक्रीसाठी उपलब्ध केला आहे.

सुझुकीने बीएस-4 इंजिनच्या हा शेवटचा लॉट लॉन्च केलाय. 2020 एडिशन नाव असलेल्या या बाइकची दिल्ली एक्स-शोरूम किंमत 13.75 लाख रुपये आहे. या बाइकचे मोजकेच युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

परंतु, एक गोष्ट निराशा करणारी आहे. ही बाइक BS-IV सह लाँच करण्यात आली आहे. कारण, भारतामध्ये 1 एप्रिल 2020 पासून BS-IV वाहन विक्री बंद होणार आहे. फक्त BS-VI वाहनांची विक्री होणार आहे.

या स्पेशल एडिशनमध्ये मेटालिक थंडर ग्रे आणि कॅटी डेअरिंग रेड अशा दोन रंगात ही बाइक उपलब्ध आहेत. यामध्ये नवीन फ्रंट ब्रेक कॅलिपर देखील मिळेल.

इंजन आणि फिचर्स

Suzuki Hayabusa जसं या बाइकचं नाव आहे तशी ती तितकीच दमदार सुद्धा आहे. परंतु, या नव्या लिमिटेड मॉडेलमध्ये कोणतेही बदल करण्यात आले नाही. मात्र, कंपनीने या बाइकमध्ये फ्रंटमध्ये नवीन ब्रेकिंग सेट-अप दिलं आहे. लिमिटेड एडिशन Suzuki Hayabusa चं इंजिन हे 1340cc आहे. ज्याची  9,500rpm वर 200bhp इतकी पॉवर मिळते. तर 7,200rpm वर 155Nm का टॉर्क जनरेट करतो. या बाइकमध्ये 6-स्पीड ट्रांसमिशन असून वेगवेगळे  रायडिंग मोड्स आणि डुअल चॅनल ABS सारखे फिचर्स आहे.

First published: December 18, 2019, 12:19 PM IST
Tags: dhoom bike

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading