• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • West Bengal Elections 2021 : शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान सोबतच होणार?

West Bengal Elections 2021 : शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान सोबतच होणार?

बंगाल विधानसभेसाठी (West Bengal Assembly Elections 2021) 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्याचबरोबर सातव्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी आणि आठव्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे.

 • Share this:
  कोलकाता 21 एप्रिल : पश्चिम बंगालमधील निवडणूक निरीक्षकांचं असं म्हणणं आहे, की जर त्यांना अतिरिक्त सुरक्षा दले दिली गेली तर शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान (West Bengal Assembly Elections 2021) एकाच वेळी होऊ शकतं. बंगालमध्ये 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्याचबरोबर सातव्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी आणि आठव्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला होणार आहे. मात्र, देशात कोरोनाचा वाढता प्रसार (Coronavirus in India) पाहाता उरलेल्या सर्व टप्प्यातील मतदान एकदाच घेण्याची मागणी होत आहे. मंगळवारी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा मतदान एकाच टप्प्यात घेण्याची मागणी केली. याचदरम्यान निवडणूक आयोगाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं इंग्रजी वृत्तपत्र ‘हिंदुस्तान टाईम्स’ ने याबद्दल माहिती दिली. वृत्तपत्रानुसार, बंगाल निवडणूक आयोगाच्या कार्यालयात किमान 25 जणांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती अधिकाऱ्यानं दिली. सोबतच कोरोनामुळे आतापर्यंत दोन उमेदवारांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार निवडणूक निरीक्षक - अजय नायक आणि विवेक दुबे यांनी गेल्या आठवड्यात या संदर्भात भारतीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते, परंतु अद्याप मतदान समितीने यावर प्रतिसाद दिला नाही. बंगालमधील आठ-टप्प्यांच्या मतदानात सहाव्या टप्प्यांतर्गत असलेल्या 43 जागांवर 22 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. कोरोनाचा कहर; मंगळवारी रुग्णसंख्येनं गाठला नवा उच्चांक, 2020 जणांचा मृत्यू हे पत्र पाहिलेले अधिकारी म्हणाले, की 'सध्या बंगालमध्ये 1000 कंपन्या कार्यरत आहेत. पुढचा टप्पा खूप जवळ आहे. त्यामुळे, याबद्दल काहीही केले जाऊ शकत नाही. कोरोना साथीच्या तीव्रतेची माहिती निवडणूक आयोगाला आहे. म्हणूनच, निरीक्षकांनी शेवटच्या दोन टप्प्यातील मतदान सोबत घेण्याचा पर्याय दिला आहे. हे मतदान सोबत घ्यायचं झाल्यास 500 अतिरिक्त कंपन्यांची आवश्यकता असेल. निमलष्करी दलाच्या प्रत्येक कंपनीत 80 कर्मचारी असतात. निवडणूक आयोगाच्या आणखी एका वरिष्ठ अधिका-यांना निरीक्षकांच्या पत्राबाबत विचारले असता, दोन कारणांमुळे निरीक्षकांची शिफारस निवडणूक पॅनेल स्वीकारू शकत नाही, असे सांगण्यात आले. ते म्हणाले, 'अतिरिक्त बल निवडणुकांचा एक भाग आहे, जो देशभरात तैनात असतो. त्यांना बंगालमध्ये पाठविण्यासाठी आधीच सूचना आवश्यक आहे. ही सूचना तीन ते चार महिन्यांपूर्वीच दिली गेली पाहिजे. दुसऱ्या एका अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, 'सहाव्या व सातव्या टप्प्यात बदल लागू करता येणार नाहीत कारण हे लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत उमेदवारांच्या हक्कांचे उल्लंघन ठरेल. गरज पडल्यास आम्ही सातव्या आणि आठव्या टप्प्यातील निवडणुकांमध्ये कोरोनाचे नियम अधिक कडक करू शकतो
  Published by:Kiran Pharate
  First published: