S M L

१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या!

10वीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी चक्क युपीच्या डीजीपींच्या नावाचं ट्विटर अकाऊंट वापरतो. बरं फक्त वापरतच नाही तर त्या अकाऊंटवरून तो अधिकाऱ्यांना सुचनाही करतो आणि...

Renuka Dhaybar | Updated On: Apr 25, 2018 04:29 PM IST

१०वीच्या विद्यार्थ्याने डीजीपीच्या फेक अकाउंटवरून दिलेल्या सूचना अधिकाऱ्यांनीही पाळल्या!

उत्तर प्रदेश, 23 एप्रिल : 10वीमध्ये शिकणारा एक विद्यार्थी चक्क युपीच्या डीजीपींच्या नावाचं ट्विटर अकाऊंट वापरतो. बरं फक्त वापरतच नाही तर त्या अकाऊंटवरून तो अधिकाऱ्यांना सुचनाही करतो आणि अधिकाऱ्यांकडून सुचनेचं पालनही होतं बरं का! आश्चर्य वाटलं ना पण हे खरं आहे.

गोरखपूर पोलिसांनी या धक्कादायक प्रकाराचा खुलासा केला आहे. दरम्यान, फसवणूक होऊनही कारवाई न केल्याच्या रागात विद्यार्थ्याने उत्तर प्रदेशचे डीजीपी ओम प्रकाश सिंह यांच्या नावाचं फेक अकाऊंट बनवलं असल्याचं तपासात समोर आलं आहे. पण पोलिसांच्या कामाला वैतागून थेट पोलिसांनाच आव्हान देणं म्हणजे जरा गंभीरच आहे.

तपासादरम्यान विद्यार्थ्याने सांगितलं की, 'माझ्या भावाला काही लोकांनी दुबईत नोकरी देण्याचं आमिष दाखवून ४५ हजार रुपयांनी लुटलं. आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार करूनसुद्धा पोलीस काही करायला तयार नव्हते. त्यांच्या या रटाळ कामाला आम्ही वैतागलो होतो. आणि त्यामुळे मी डीजीपीच्या नावे फेक अकाउंट बनवून पोलिसांना आदेश देत होतो.'

या प्रकरणात, आरोपी आणि त्याच्या मित्राला बनावट खाते उघडण्यासाठी पोलिसांना अटक केली. पण असं काही पुन्हा करू नका अशी सक्त ताकीद देऊन आम्ही मुलांना सोडून दिलं आहे असं डीजीपी ओम प्रकाश म्हणाले आहेत. मुलांचे भविष्य खराब होऊ नये म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान असे प्रकार आम्ही परत करणार नाही अशी कबुलीही मुलांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 12:33 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close