जम्मू काश्मीर : पुलवामात लष्कराने खात्मा केलेल्या 4 दहशतवाद्यांची ओळख पटली

जम्मू  काश्मीर : पुलवामात लष्कराने खात्मा केलेल्या 4 दहशतवाद्यांची ओळख पटली

हिजबुल आणि लष्कर ए तोयबाच्या चार दहशतवाद्यांचा खात्मा

  • Share this:

पुलवामा, 1 एप्रिल : जम्मू काश्मीरमध्ये भारताच्या सुरक्षादलाने रविवारी लष्कर ए तोयबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. पुलवामातील लासिपोरा भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यात चार दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. तसेच या ठिकाणाहून शस्त्रेही जप्त करण्याती आली होती.

सुरक्षा दलाच्या चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली असून जफ्फर पॉल( शोपियान ), तौसिफ अहमद याट्टू(पुलवामा), अकिब अहमद कुमार (शोपियान), मोहद शफी भट(शोपियान) अशी कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हिजबुल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या कारवायांमध्ये हे सर्वजण सहभागी होते.

दरम्यान, सोमवारी पाकिस्तानी सैन्याने पूँछमध्ये केलेल्या गोळीबारात एका पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू  झाला. सोबिया शरीफ असं या मुलीचं नाव आहे. सोबियासह १० नागरिकांचा या गोळीबारात मृत्यू ओढवला आहे.

पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे एक अधिकारीही शहीद झाले.तसंच ४ सुरक्षा कर्मचारी जखमी झाले.

भारतीय सैन्यानेही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानी सैन्याने सोमवारी सकाळी नियंत्रण रेषेवरच्या शाहपूर आणि करनी क्षेत्रात गोळीबार सुरू केला. या गोळीबारात पूँछमधल्या नागरिकांचा हकनाक बळी गेला.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने बालाकोटवर हवाई हल्ला करून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा केला. पाकिस्तानने या हल्ल्याचा वेळोवेळी इन्कार केला आहे.

या हल्ल्यानंतर पूँछ, राजौरी क्षेत्रात पाकिस्तानने सीमारेषेचं उल्लंघन करून गोळीबार केल्याच्या घटना घडल्या होत्या. पाकिस्तानी सैन्याकडून पूँछ आणि राजौरीमध्ये गेले चार दिवस सतत गोळीबार सुरू आहे.

VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

First Published: Apr 1, 2019 05:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading