हाफिज सईदला ‘ईडी’चा दणका, 1 कोटीची मालमत्ता जप्त

हाफिज सईदला ‘ईडी’चा दणका, 1 कोटीची मालमत्ता जप्त

जहूर अहमद शाह वटालीची ही कोटींची संपत्ती ही गुरुग्राममध्ये आहे. याची किंमत 1 कोटी 3 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

  • Share this:

गुरुग्राम, 12 मार्च : गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी कारवाया वाढवत अंमलबजावणी संचालनालयाने(ईडी) लष्कर ए तोयबाचा काश्मीरी व्यवसायी असलेला जहूर अहमद शाह वटालीच्या एक कोटीची संपत्ती जप्त केली आहे. वटाली हा लष्कर-ए-तोयबाचा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदचा बँक आणि फायनान्सियर असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.

जहूर अहमद शाह वटालीची ही कोटींची संपत्ती ही गुरुग्राममध्ये आहे. याची किंमत 1 कोटी 3 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. अनेक मुख्य आरोपांवरू ईडीने वटालीची संपत्ती जप्त केली आहे.
दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपाखाली 2017 मध्ये वटाली सह तब्बल 18 जणांविरोधा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात अद्यापही चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीची कारवाई धनशोधन निरोधक अधिनियमच्या अंतर्गत सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 12, 2019 02:49 PM IST

ताज्या बातम्या