• Home
  • »
  • News
  • »
  • national
  • »
  • महाराष्ट्र सदनाच्या जेवणात ताटात आढळली जिवंत अळी, धक्कादायक VIDEO

महाराष्ट्र सदनाच्या जेवणात ताटात आढळली जिवंत अळी, धक्कादायक VIDEO

मंत्री, आमदार, खासदार आणि अधिकारी सदनात जेवण करतात. साफ सफाईबाबत कॅंटीन मालकाचे दुर्लक्ष कसे झाले.

  • Share this:
मुंबई, 07 एप्रिल : नवी दिल्लीतील (New delhi) महाराष्ट्र सदनात (Maharashtra Sadan) अत्यंत किळसवाणा प्रकार समोर आला आहे. कँटीनमध्ये जेवण घेत असताना चक्क जिवंत अळीआढळून आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्र सदनात खळबळ उडाली आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदन म्हणजे मराठी माणसांचे हक्काचं स्थान पण इथल्या कॅंटीनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण दिलं जात असल्याचे समोर आले आहे.  कॅंटीनमध्ये जेवणाच्या ताटात जिवंत अळ्या सापडल्या आहेत. कँटीनमध्ये जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर ताट मांडले असता कांद्यावर जिवंत अळी आढळून आली. त्यामुळे ग्राहकाने हा प्रकार आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून कैद केला. याबद्दल उपस्थितीत मॅनेजरला याबद्दल जाब विचारला, असता त्याने दिलगिरी व्यक्त केली. झाल्याच्या प्रकारबद्दल माफी सुद्धा मागितली. ओ तेरी! अनुष्काची कृती पाहून विराटही झाला चाट; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल मंत्री, आमदार, खासदार आणि अधिकारी सदनात जेवण करतात. साफ सफाईबाबत कॅंटीन मालकाचे दु्र्लक्ष कसे झाले, याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थितीत झाले आहे.  वारंवार कॅंटीन संदर्भात खासदार, आमदार तक्रारी  करीत असतात, पण कोणतीही कारवाई होत नाही. आता तरी करवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published by:sachin Salve
First published: